नाशिकरोड

भरधाव ट्रकच्या धडकेने गर्भवती लेकीसह आईचा मृत्यू

नाशिकरोडची घटना; अतिक्रमणांमुळे गेला बळी

 

                                                         शीतल प्रेमचंद केदारे

                                                    सुनीता भीमराव वाघमारे

 

जन्मापूर्वीच बाळाचा मृत्यू
महापालिकेची बेपर्वाई
अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या बेपर्वाईमुळे नाशिकरोडला जन्माला येण्याच्या आधीच बाळाचा आणि मायलेकीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मुक्तिधाम मंदिरासमोरील अतिक्रमणाने वेढलेल्या धोकादायक रस्त्यावर मंगळवारी (दि. 19) सायंकाळी भरधाव ट्रकच्या धडकेत गरोदर महिला व तिच्या आईचा अंत झाला.
बिटकोकडून मालधक्का रोडकडे एक ट्रक (एमएच 04- ईएल 0446) भरधाव जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने होंडा सिटी कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या दोन रिक्षा उडवून थेट रस्ता ओलांडत असलेल्या आई व तिच्या गरोदर असलेल्या लेकीला धडक दिली. या अपघातात सुनीता भीमराव वाघमारे (वय 50, रा. नाशिकरोड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आठ महिन्यांची गरोदर असलेली त्यांची मुलगी शीतल प्रेमचंद केदारे (वय 27, रा. मखमलाबाद, नाशिक) गंभीर जखमी झाली. नागरिकांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शीतलचे बाळ दगावले आणि अखेर बुधवारी उपचारादरम्यान शीतलचाही मृत्यू झाला. प्रसूतीसाठी शीतल माहेरी आली होती. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे झालेल्या या अपघातात आई-मुलगी आणि जन्माला न आलेल्या बाळाचा अंत झाला.

आणखी किती बळी घेणार?

या घटनेने संपूर्ण नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुक्तिधामसमोरील अतिक्रमणे हटवावीत, मालधक्का रोडवरील अवजड वाहतूक थांबवावी, रस्ता रुंद करावा आदी मागण्या नागरिक वर्षानुवर्षे करत आहेत; परंतु मनपा प्रशासनाला जाग येत नाही. वाहतुकीची कोंडी व वेगवान वाहनांमुळे नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. विना क्रमांकाचे डम्पर व अन्य वाहने पोलिसांसमोर जात असतानाही पोलीस परराज्यातील ट्रकचालकांकडून वसुली करण्यातच धन्यता मानत आहेत. मुक्तिधामशेजारी व बिटको थिएटरशेजारील रस्त्यावर अतिक्रमणांनी कळस गाठला आहे. प्रशासनाची बेपर्वाई आणखी किती बळी घेणार, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशिष गायकवाड पुढील तपास करत आहेत.

 

 

Editorial Team

Recent Posts

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

9 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

26 minutes ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

22 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

22 hours ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

22 hours ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

22 hours ago