नाशिक

यशवंत मंडईत बहुमजली पार्किंग रखडली

पाच वेळा फेरनिविदा, ठेकेदारांची अनुत्सुकता

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रविवार कारंजावरील महापालिका मालकीची यशवंत मंंडई जमीनदोस्त करून तेथे बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. या पार्किंगचे बांधकाम विकासकानेच करायचे अन् त्याला तीस वर्षांच्या करारनाम्यावर द्यायची, असे नियोजन पालिकेने केले आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, सुरुवातीपासूनच ठेकेदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे, पाच वेळेस फेरनिविदा काढूनही त्याकडे कोणी फिरकले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी जमीनदोस्त केलेल्या यशवंत मंडईच्या जागेवरील बहुमजली पार्किंग रखडली आहे.
जीर्ण झालेल्या यशवंत मंडई इमारतीचे महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट केले असता, ती कधीही कोसळण्याचे अहवालातून समोर आले होते. त्यानंतर 2 जुलै 2025 पासून ही इमारत पाडण्यास सुरुवात करण्यात आली. खासगी भागीदारी तत्त्वावर तीस वर्षे सदर पार्किंग मक्तेदारास चालविण्यास दिली जाणार आहे.
चारचाकी वाहने लावण्यासाठी रविवार कारंजा भागात कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. परिणामी, या भागात सतत वाहतूक कोंडी होतेे. यावर उपाय म्हणून महापालिकेने बहुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काही व्यावसायिक गाळे व वरच्या मजल्यावर पार्किंग याद़ृष्टीने नियोजन आहे. परंतु, निविदा प्रक्रिया राबवूनही मक्तेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खर्च वाचवण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसते आहे. त्यामुळे खासगी विकासकांकडून मोठ्या प्रकल्पाची कामे करून घेतली जात आहेत. याच धोरणानुसार आडगाव येथील ट्रक टर्मिनलचे विकासकाकडूनच काम करून घेतले जात आहे.

विकासकाला शिंदेसेनेचा विरोध

काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे पदाधिकारी सचिन भोसले यांनी खासगी विकासकाच्या माध्यमातून सदर काम होता कामा नये. शासनाच्या नगरविकास खात्याने किंवा महापालिका प्रशासनाने आपल्या निधीतून हे काम करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Multi-level parking project at Yashwant Mandai stalled.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago