मनपाला उच्च न्यायालयाने फटकारले; साधुग्राम वृक्षतोड प्रकरण
नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील साधुग्राममधील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकेवर मंगळवारी (दि.17) महापालिका व वृक्ष प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले. 24 फेब्रुवारीला प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणी घेऊ, असेही खडे बोल महापालिकेला सुनावण्यात आल्याचे याचिकाकर्ते अॅड. नितीन पंडित यांनी सांगितले.
तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच गाजतो आहे. पर्यावरणप्रेमींनी तपोवनातील एकही झाड तोडू देणार नसल्याचा इशारा देत वेगवेगळे आंदोलन करत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. वृक्षतोडीला स्थगिती मिळावी याकरिता उच्च न्यायालयात अॅड. पंडित यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु महापालिका प्रशासन गेल्या तीन- चार महिन्यांपासून निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने सुनावणी पुढे घेण्याची विनंती केली होती. मात्र निवडणूक झाल्यानंतर मनपा व वृक्ष प्राधिकरणास मंगळवारी न्यायालयात अंतरिम अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करणे अपेक्षित होते. यावेळेसही मनपाने वेळकाढूपणा केल्याचे अॅड. पंडित यांनी म्हटले.
आता शेवटची संधी
उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अंतरिम अर्जावर नाशिक महानगरपालिकेला व वृक्ष प्राधिकरणास न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरिता शेवटचा आठवड्याची संधी देण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास एकतर्फी सुनावणी करण्यात येईल.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…