नाशिक

शहरात विविध कामांमुळे वाहतूक कोंडी

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर इ-चलानची कारवाई

नाशिक ः प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी 30 रस्त्यांचे रुंदीकरण दुरुस्ती आणि चार उड्डाणपुलांचे काम हाती घेतले आहे. जलवाहिनी आणि गटारीच्या कामांसाठी काही ठिकाणी खोदकाम होत आहे. अशा परिस्थितीत शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांविरोधात पुढील आठवड्यात सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे इ-चलान कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
शहरात महापालिकेने सिंहस्थ तसेच भुयारी गटार, रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे.जलवाहिनी आणि गटारीच्या कामांसाठी काही ठिकाणी खोदकाम होत आहे. शहराच्या प्रवेशद्वार द्वारका चौकात महत्त्वाचे भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. या कामांमुळे मोठ्याप्रमाणात वाहनधारकांची गर्दी होत आहे. या कामांमुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. केलेले बदल प्रवासी, वाहनधारकांना माहिती नसल्याने वेळ, इंधन वाया जाण्यासह गर्दीमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. इंदिरानगर, मुंबई नाका, द्वारका चौक, निमाणी, सीबीएस आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
रस्ते आणि भुयारी गटारी, रुंदीकरणाच्या कामांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, पर्यायी मार्गाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शालेय विद्यार्थी, परीक्षार्थी यांना पर्यायी दूरच्या मार्गावरून जावे लागत आहे. बारावीची परीक्षा सुरू असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी तासभर अगोदर निघावे लागत आहे. शहरातील ठराविक सिग्नल यंत्रणा काम करीत असल्या तरी होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे सिग्नल तोडण्याचे प्रकार नागरिकांकडून सर्रास होताना दिसून येत आहे.
पुढील वर्षी होणार्‍या कुंभमेळ्यासाठी महापालिका रस्ते, पुलासह विविध प्रकारची पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर करीत आहे. एकाचवेळी ही कामे सुरू झाल्याने अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविणे किंवा विरुद्ध मार्गावरील बाजूने दुहेरी वाहतूक असे पर्याय वापरण्यात
येत आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी

शहरातील रस्त्यांचे विविध कामे मार्च 2027 पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे अजून वर्षभर या वेगवेगळ्या भागातील स्थितीमुळे पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आवश्यकता असल्यासच चारचाकी वाहनाचा वापर करावा, सद्यस्थितीत दुचाकी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जुन्या वादातून युवकाचा कोयत्याने खून…या भागात घडली घटना

सिडको : प्रतिनिधी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर परिसरात जुन्या वादातून एका युवकाचा…

17 hours ago

सोशल मीडियावरही ’आयपीएल’चा फीव्हर; हिताचे रक्षण व्हायला हवे!

आयपीएल अर्थात, इंडियन प्रीमियर लीगचे हे एकोणिसावे वर्ष आहे. सलग एकोणीस वर्षे आपली लोकप्रियता टिकवून…

2 days ago

मान्सून अंदाज चिंताजनक

चार वर्षांपूर्वी म्हणजे 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले. या युद्धाचा परिणाम जगावर…

2 days ago

गणवेश-साहित्य खरेदीत शाळांच्या सक्तीला लगाम!

पालकांना पसंतीच्या दुकानांतून खरेदीची मुभा; शिक्षण विभागाचे परिपत्रक सिन्नर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या गणवेश, वह्या-पुस्तके तसेच…

2 days ago

सिन्नरमध्ये आजपासून क्रिकेटचा महासंग्राम

‘आयपीएल’च्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव; 16 संघांमध्ये रंगणार टेनिस बॉल डे-नाईट स्पर्धा सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर…

2 days ago

कळवणला प्रसूतीनंतर काही तासांत मातेचा मृत्यू

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कळवण : प्रतिनिधी प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मातेचा प्रसूतीनंतर काही…

2 days ago