नाशिक

कर्जरोख्यांतून मनपा उभारणार 400 कोटी

सीए, तज्ज्ञ सल्लागारासह कायदेतज्ज्ञही नेमणार

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका प्रशासनाने आपला वाट्याचा हिस्सा देण्यासाठी मागील काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. यासाठी दोनशे कोटींचे नियमित म्युनिसिपल बॉण्ड (कर्जरोखे) व दोनशे कोटींचे ग्रीन बॉण्ड (कर्जरोखे) उभारले जात आहेत. या प्रक्रियेसाठी महापालिकेने तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एका कॅपिटल बँकर संस्थेवर या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच स्वतंत्र सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट), कायदेशीर सल्लागार (लीगल अ‍ॅडव्हायझर) यांचीही नेमणूक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याकरिता 40 लाखांचा खर्च येणार आहे.
येत्या दोन वर्षांनी शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेकडून व्यापक नियोजन सुरू करण्यात आले आहे. मनपाने आपला हिस्सा देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 200 कोटी रुपये ग्रीन बॉण्ड उभारत आहेत. या रकमेतून मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन प्रकल्पासह इतर पायाभूत सोयीसुविधांची उभारणी केली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात आणखी 200 कोटींच्या बॉण्डद्वारे रस्ते, पाणी, मलनिस्सारण, प्रकाशव्यवस्था या विकासकामांसाठी खर्च करेल.
सिंहस्थाच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पायाभूत सुविधा उभारणे ही जबाबदारी शासनावर आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासकामे होणार असून, त्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी महापालिकेने आता वित्तीय नियोजनाचा मार्ग अवलंबला आहे. कुंभमेळ्यासाठी 25 टक्के वाटा महापालिकेचा असणार आहे. त्यासाठी मनपा निधी उभारून ठेवत आहे. शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे नाशिकमध्ये प्रथमच ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारणी होत आहे.

मनपाकडून उभारण्यात येणार्‍या 400
कोटींच्या कर्जरोख्यांची प्रक्रिया सुरू आहे. विशेष तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक झाली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार काम सुरू आहे.
– दत्तात्रय पाथरूट, मुख्य लेखाधिकारी, मनपा

 

 

Editorial Team

Recent Posts

’समृद्धी’वरून मुंबईला निघताय? आधी ब्लॉकच्या वेळा पाहा!

♦ भरवीर ते इगतपुरी इंटरचेंज 11 दिवस वाहतूक निर्बंध ♦ दिवसातून तीन वेळा एक तास…

5 minutes ago

500 कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटी करणार तपास

गृहमंत्री फडणवीसांचे मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष पथक स्थापण्याचे आदेश मुंबई : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील…

13 minutes ago

चक्रीवादळ ‘अर्नाब’चा धोका वाढला

 इस्रोने टिपले रौद्ररूप, आंध्र किनारपट्टीकडे झेप नवी दिल्ली : प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात घोंघावणार्‍या चक्रीवादळ ’अर्नाब’…

24 minutes ago

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

21 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

21 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

21 hours ago