नाशिक विभाग म्हणजे केवळ द्राक्ष, कांदा आणि कुंभमेळा एवढीच ओळख राहिलेली नाही. उद्योग, शेती, पर्यटन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, आधुनिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांमध्ये मोठे बदल घडत आहेत. प्रत्येक जिल्ह्याची वेगळी ओळख आणि क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नंदुरबारमधील आदिवासी विकासापासून नाशिकच्या लॉजिस्टिक हबपर्यंत, शेतकर्यांच्या फार्मर आयडी पासून महसूल विभागाच्या 100 टक्के संगणकीकरणापर्यंत आणि ग्रामीण भागातील दोन लाख घरकुलांपासून 2027 च्या कुंभमेळ्याच्या तयारीपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.
प्रश्न : प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यामागील विचार काय आहे?
उत्तर : प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकाच पद्धतीचा विकास सर्वत्र शक्य नाही. आम्ही प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक ताकद ओळखून विकासाचे नियोजन केले आहे. त्यामुळे विकास अधिक परिणामकारक ठरेल.
प्रश्न : नंदुरबारच्या विकासासाठी कोणत्या योजना महत्त्वाच्या आहेत?
उत्तर : नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे स्थानिक उत्पादने, काठीची होळीसारखे सांस्कृतिक उत्सव आणि तोरणमाळ पर्यटनस्थळाला प्रोत्साहन दिले जात आहे. नंदुरबारची प्रसिद्ध मिरची मोठ्या बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मडीफ वर्गातील जिल्हा असल्याने उद्योगांना कमी कर, कमी वीजदर आणि कमी खर्चाचा लाभ मिळतो. सुरतची बाजारपेठ जवळ असल्यामुळे नवीन एमआयडीसी विकसित होत आहे.
प्रश्न : जळगाव जिल्ह्याची ताकद कशी वाढवली जात आहे?
उत्तर : जळगावमध्ये पीव्हीसी, सोने-चांदी आणि केळीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील मोठी केळीची टिशू कल्चर लॅब येथे उभी राहत आहे. त्यामुळे शेतकर्यांना दर्जेदार रोपे मिळतील आणि उत्पादन वाढेल.
प्रश्न : नाशिकला ग्रोथ हब का म्हटले जाते?
उत्तर :नाशिकमध्ये महिंद्रा, बॉश, एबीबीसारखे मोठे उद्योग आहेत. समृद्धी महामार्गामुळे संपर्क वाढला आहे. भविष्यात नाशिक-चेन्नई, नाशिक-वाढवण एक्स्प्रेस वे आणि रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर नाशिक देशातील महत्त्वाचे लॉजिस्टिक हब बनेल. निफाडचे ड्राय पोर्ट, द्राक्ष आणि कांदा उद्योग, धार्मिक पर्यटन आणि 2027 चा कुंभमेळा यामुळे विकासाला मोठी गती मिळेल. कुंभमेळ्याची महत्त्वाची पायाभूत कामे मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रश्न : शेती अधिक सक्षम करण्यासाठी काय केले जात आहे?
उत्तर : पोकरा योजनेद्वारे पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना बळ दिले जात आहे. प्रत्येक शेतकर्याला मफार्मर आयडीफ दिला जात असून त्यामुळे सरकारी मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते. हवामानाचा अंदाज, जमिनीच्या प्रकारानुसार पीक निवड आणि आधुनिक अॅग्रीटेकचा वापर वाढवला जात आहे.
प्रश्न : युवकांसाठी रोजगाराच्या कोणत्या संधी निर्माण होत आहेत?
उत्तर :उद्योगांना आवश्यक कौशल्ये आणि महाविद्यालयांमधील शिक्षण यातील अंतर कमी करण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला आहे. स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवला जात आहे.
प्रश्न : महसूल प्रशासनात कोणते बदल झाले?
उत्तर :महसूल विभागातील सर्व न्यायालयीन प्रकरणे 100 टक्के संगणकीकृत झाली आहेत. मराजस्व अभियानफद्वारे गावागावात जाऊन जमिनीचे वाद, पांदण रस्ते आणि महसुलाशी संबंधित प्रश्न सोडवले जात आहेत. तंत्रज्ञानामुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक झाली आहे.
प्रश्न : आपत्ती व्यवस्थापनात कोणते बदल झाले?
उत्तर : प्रत्येक जिल्ह्यात 24 तास कार्यरत यंत्रणा आहे. आपत्ती आल्यावर मदत करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी पूर्वतयारीवर भर दिला जातो. नाशिकमधील पुरावेळी नागरिकांना पाच-सहा तास आधी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. हा सर्व विभागांच्या समन्वयाचा परिणाम होता.
प्रश्न : ग्रामीण आणि शहरी विकासात समतोल कसा साधत आहात?
उत्तर :शहरांकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. आदिवासी भागात मिलेट्स, बागायती भागात ऊस, तर इतर भागात मका आणि कापूस आधारित उद्योगांना चालना दिली जात आहे. गेल्या एका वर्षात ग्रामीण भागात दोन लाख घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रश्न : नाशिक विभागाचे भविष्यातील व्हिजन काय आहे?
उत्तर : विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. उद्योग, शेती, पर्यटन, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि पारदर्शक प्रशासन यांच्या माध्यमातून नाशिक विभागाला राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श विकास विभाग बनवण्याचे आमचे ध्येय आहे.
♦ प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा.
♦ नंदुरबारमध्ये नवीन एमआयडीसी व आदिवासी पर्यटनाला चालना.
♦ जळगावमध्ये केळीवर आधारित उद्योग आणि मोठी टिशू कल्चर लॅब.
♦ धुळे व अहमदनगरमध्ये डिफेन्स क्लस्टर.
♦ नाशिकला लॉजिस्टिक हब बनवण्याचे नियोजन.
♦ 2027 कुंभमेळ्याची पायाभूत कामे मार्च-एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
♦ आपत्तीपूर्व नियोजनावर विशेष भर.
♦ ग्रामीण भागात एका वर्षात दोन लाख घरकुलांची उभारणी.
♦ नाशिक विभागाला देशातील लॉजिस्टिक हब बनवण्याचे नियोजन आहे.
♦ शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.
♦ फार्मर आयडीमुळे योग्य शेतकर्यांपर्यंतच सरकारी मदत पोहोचेल.
♦ स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळालाच पाहिजे.
♦ पारदर्शक प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत आहोत.
♦ आपत्ती व्यवस्थापनात पूर्वतयारी हीच सर्वात मोठी ताकद आहे.
♦ ग्रामीण विकासाशिवाय राज्याचा विकास शक्य नाही.
♦ कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाचा मोठा टर्निंग पॉइंट ठरेल.
♦ लोकसहभाग आणि सुशासनाच्या बळावर नाशिक विभाग आदर्श विकास मॉडेल बनेल.
Nashik set to become a leading growth center due to Simhastha.
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…