नाशिक सिंहस्थ

सिंहस्थ कुंभमेळा: सहा हजार कोटींच्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ

नाशिक : प्रतिनिधी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुमारे सहा हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, गुरुवारी (दि. 13) करण्यात येणार आहे. अनेक कामांची टेंडरप्रक्रिया पूर्ण झाली असून, ती आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त व कुंभमेळा संयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

रस्ते, धरणे, पूल, मंदिर विकासाचा समावेश
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपला असताना, अनेक विकासकामांना अद्याप प्रारंभ न झाल्याबद्दल विविध स्तरांवरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर डॉ. गेडाम यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी होणार्‍या शुभारंभ कार्यक्रमात सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ करण्यात येईल.
आणखी 3000 कोटींची कामे
डिसेंबरपर्यंत आणखी तीन हजार कोटींंच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याची माहिती देताना डॉ. गेडाम म्हणाले की, यात अजिंठा रोडचे भूसंपादन, पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्ते सुधारणा, तसेच द्वारका सिग्नलवरील अंडरपास या कामांचा समावेश असेल. त्यासोबतच त्र्यंबकेश्वर दर्शनपथ, अतिरिक्त घाटबांधणी आणि जलसंपदा विभागाच्या काही प्रलंबित प्रकल्पांचाही समावेश या टप्प्यात होणार आहे.

पाणीपुरवठा नियोजन
शहराला लागणार्‍या अतिरिक्त पाण्याच्या गरजेसाठी मुकणे धरणातून नाशिकसाठी, तर बेझे धरणातून त्र्यंबकेश्वरसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. धार्मिक कामांसाठी पाणी आरक्षण करता यावे यासाठी शासनाने अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार नियोजन केले जाईल, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

ठेकेदाराची लेखी हमी आवश्यक
द्वारका सर्कलवरील अंडरपासचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराने काम वेळेत पूर्ण करण्याची लेखी हमी दिल्यासच या कामाला मंजुरी दिली जाईल, असे गेडाम यांनी स्पष्ट केले. एकंदरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार्‍या या कार्यक्रमातून नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी शहर सज्जतेच्या दिशेने पुढे जात आहे.

या कामांचा होणार शुभारंभ
♦  जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या फेज-1 प्रकल्पाचा शुभारंभ.
♦  सार्वजनिक बांधकाम विभागाचे आठ रस्ते प्रकल्प. (2,270 कोटी)
♦  मनपाचे 900 कोटींचे रस्तेकाम.
♦  सहा ते आठ पुलांच्या बांधकामांची सुरुवात.
♦  मुकणे व बेझे या धरणांतून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती.
♦  पंधराशे कोटींच्या एसटीपी विकास प्रकल्पाचा प्रारंभ.
♦  रामकुंड परिसर, सीसीटीव्ही व्यवस्था आणि पुरातत्त्व मंदिर विकास प्रकल्प या सर्व कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी एकत्रित सुमारे सहा हजार कोटींच्या कामांना प्रारंभ होणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे सविस्तर कव्हरेज वाचण्याकरता खालील संकेतस्थळावर अवश्य भेट द्या:

https://gavkarinews.com/category/simhastha-nashik/

Editorial Team

Recent Posts

कांद्याचा का होतो नेहमीच वांधा?

- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…

16 hours ago

ये तो होना ही था!

- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…

16 hours ago

1972 ते 2026 : दुष्काळ बदलला, पण प्रश्न तेच

- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…

17 hours ago

मदतीची शिक्षा!

- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्‍या अनेक घटना सातत्याने…

17 hours ago

गुरू नानक : समता, सेवा आणि मानवतेचा प्रकाश

नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…

17 hours ago

धर्मनिरपेक्ष भगवी वाट

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…

17 hours ago