नवरंगोत्सवाने संचारले नवचैतन्य

नवरंगोत्सवाने संचारले नवचैतन्य
गृहिणी असणे सर्वांत अवघड जॉब: किरणकुमार चव्हाण

नाशिक : प्रतिनिधी
महिलांमध्ये उपजतच कलागुण असतात. कुटुंंब सांभाळत असताना स्वत:ला नोकरी करत सिद्ध करणे कठीण असते. मात्र, जगातील सर्वांत अवघड जॉब गृहिणींचा असतो. कारण ती चोवीस तास कामातच असते. कुटुंबासाठी झटताना स्वतःकडे महिला लक्ष देत नाहीत, मात्र अशा
स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाल्यास स्वत:ला सिद्ध करत असतात. एकाच वेळी अनेक कामे योग्यरीतीने करण्याचे कसब महिलांमध्ये असते. महिलांचा नवरात्रीच्या निमित्तानेच नाही तर इतर वेळीही सन्मान करायला हवा, असे मनोगत पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले. नवरात्रोत्सवानिमित्त दैनिक गांवकरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवरंगोत्सवातील 54 भाग्यवान महिलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. मुंदडा साडी निकेतन, निफाड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, निफाड, छ. द. भावसार सराफ, आर. एस. ट्रॅक्टर हाऊस, गजानन एन्टरप्रायजेस मांजरगाव, आदर्श माँटेसरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी प्रायोजित केलेल्या आणि पंचवटी लायन्स क्लबच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी (दि.15) लायन्स क्लब हॉल येथे पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, सावानाचे उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, आर. एस. ट्रॅक्टर हाऊसच्या संचालक स्मिता सोनवणे, मुंदडा साडीचे नयन मुंदडा, ज्योती मुंदडा, अरविंद राठी, जयश्री राठी, पंचवटी लायन्स क्लबच्या अध्यक्षा रितू चौधरी, नीलिमा जाधव, दै. गांवकरीचे वृत्तसंपादक भागवत उदावंत, उपसंपादक गोरख काळे, उपसंपादक देवयानी सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंपादक अश्विनी पांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन उपसंपादक के. के. अहिरे यांनी केले. आभार उपसंपादक चंद्रमणी पटाईत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहिद बागवान, समाधान रोकडे, ग्रेसी वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
कलागुणांना वाव देणे गरजेचे : स्वाती जाधव

यावेळी काँग्रे्रसच्या महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव म्हणाल्या की, दै. गांवकरीतर्फे आयोजित नवरंगोत्सवात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे अभिनंदन करते. स्पर्धा म्हटले की यश-अपयश आलेच. पण त्यात सहभागी होणे महत्त्वाचे असते. गांवकरीने महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हा स्तुत्य उपक्रम आहे. महिलांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्पर्धेत सहभागी व्हावे आणि जिथे संधी असेल तिथे अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे.
‘गांवकरी’च्या उपक्रमाचे कौतुक : नयन मुंदडा
नयन मुंदडा यांनी दै. गांवकरीने राबवलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक करत मुंदडा साडीजच्या वतीने दिवाळीनिमित्त महिलांसाठी देण्यात येणार्‍या विशेष सवलतीची माहिती दिली.
लेखनासही प्राधान्य द्यावे : विक्रांत जाधव

दै. गांवकरी सातत्याने वाचकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. पाककला स्पर्धा, मोदक स्पर्धा, नवरंग स्पर्धा यातून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. महिलाही अशा उपक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद देत असतात. या उपक्रमासह महिलांनी त्यांचे लेखनही गांवकरीत द्यायला हवे. गांवकरी वृत्तपत्रात महिलांच्या लेखनाला नक्कीच प्रसिद्धी मिळेल, असे वैद्य विक्रांत जाधव म्हणाले.
पिवळा1 छाया पुंडे, नाशिक
2 कविता हिरे, चाटोरी
3 श्रीमती तुपे, शिंदे गाव
4 डॉ. अश्विनी दाते, ध्रुवनगर
5 मनुजा गायकवाड, रासबिहारी
6 चेतना सेवक, पंचवटी
हिरवा

1 प्रतिभा बाचकर, दीपालीनगर
2 अमृता चव्हाण, नाशिक
3 ज्योती जॉर्ज, देवळाली कॅम्प
4 पायल मोरे, सायखेडा
5 कीर्ती वर्मा, पाथर्डी फाटा
6 शिखा जैन, अशोकस्तंभ
राखाडी
1 नलिनी गांगुर्डे, आंबेवणी
2 प्रीती शिंदे
3 मंजुषा चव्हाण, पंचवटी
4 चांदणी भंडारी, नाशिक
5 स्वाती पवार, गोविंदनगर
6 त्रिवेणी वाघ, ध्रुवनगर
नारंगी
1 गायत्री जाधव, गंगापूररोड
2 कांचन शिंदे, उत्तमनगर
3 कल्पना पंडित, टाकळी रोड
4 अर्पिता गुंजाळ, नाशिकरोड
5 मोनाली तिकुटे, विल्होळी
6 सविता मारू, नाशिक
सफेद

1 रिंकू पाटील, शिवाजीनगर
2 संध्या गांगुर्डे, नाशिकरोड
3 रूपाली ढोकणे, सिडको
4 भावना नागपुरे, सिडको
5 प्रियांका गोस्वामी, जेलरोड
6 ज्योती घुगे, गंगापूररोड
लाल

1 प्रियांका रणमळे, सिन्नर
2 सागरिका निकम, नाशिक
3 दिव्यांनी पवार, नाशिक
4 अनुसया गांगुर्डे, लहवित
5 तेजस्वी छलारे, जेलरोड
6 सुरेखा आहेर, तिडके कॉलनी

1 वृषाली अमृतकर
2 मोनाली हारदे
3 गीतांजली सोनवणे, गंगापूररोड
4 अर्चना नाटे, चांदोरी
5 पुष्पा अडागळे, द्वारका
6 संगीता महाजन, सिडको


गुलाबी

1 रूपाली जाधव, सटाणा
2 शीतल निकम, वनसगाव
3 पूनम वाणी, कर्मयोगीनगर
4 सुरभी कासठ, सिन्नर
5 अर्चना जोगड, नाशिक
6 सीमा ताडगे, कॅनडा कॉर्नर
जांभळा
1 कामिनी निकुंभ, जेलरोड
2 पूनम शेजवळ, नाशिकरोड
3 कविता विसावे, नाशिक
4 अंजली चांडोले, नाशिकरोड
5 मीरा सुमरा, डीजीपीनगर
6 दर्शना अहिरे, पंचवटी

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

कल क्या होगा किसने जाना?

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये सध्या कामांची लगीनघाई सुरू आहे.…

42 minutes ago

गुलामी

इतिहासात आपण भारतीय, कितीक लोकांचे आणि किती वर्ष गुलाम होतो हे आता आपल्याला चांगलेच ठाऊक…

46 minutes ago

स्टारलिंकचे संकट आणि भारताची सुरक्षा भूमिका

- प्रा. राजेंद्र आढाव युक्रेनमध्ये रशियाविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा…

58 minutes ago

आभासी समृद्धीचा उथळ फुगा!

- सीमाताई मराठे ज्या वयात तरुणांच्या हातात बचत, गुंतवणूक आणि भविष्याची सुरक्षितता असायला हवी, त्या…

1 hour ago

प्रचार- प्रसार प्रभाव

- राजेश शिरभाते एकावेळेस कोणी आपल्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च करतो, तर एखादा तरुण त्याचे…

1 hour ago

अन्नासाठी दाही दिशा… विकासाच्या दाव्यांमागचे कुपोषणाचे वास्तव

देशाची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, अन्नधान्याचे उत्पादन, महामार्गांची उभारणी आणि तंत्रज्ञानातील प्रगती यांचा अभिमानाने उल्लेख…

2 hours ago