नाईक संस्था अध्यक्ष पुत्राची दबंगगिरी

नाईक संस्था अध्यक्ष पुत्राची दबंगगिरी
नाशिक ः प्रतिनिधी
पत्नीशी वाद घालणार्‍या मुलीला नापास करण्याची मागणी करत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक आणि कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाच्या मुलाने राडा केल्याची घटना घडली.
नाईक संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांची स्नुषा शिक्षण घेत आहे. वर्गातील मैत्रिणींमध्ये आपापसात वाद झाले. त्यामुळे थोरे यांच्या सुनेने तिचे पती आदित्य थोरे यांना फोन करून बोलावून घेत सर्व प्रकार कथन केला. आदित्य थोरे यांनी महाविद्यालयात धाव घेतली. त्यांनी प्राचार्य तसेच प्राध्यापकांना ही संस्था माझ्या बापाची आहे. तुम्ही मला ओळखलं नाही का? अशा एकेरी भाषेत वाद घातला. तसेच ज्या मैत्रिणीबरोबर वाद झाला तिला परीक्षेत नापास करा, अशी मागणी करत महाविद्यालयातच गोंधळ घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर संस्थेचे सहचिटणीस ऍड. तानाजी जायभावे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र संस्था प्रशासनाकडे तर संचालक ऍड. जयंत सानप यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था ही सामाजिक संस्था असून, संस्थेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी संस्थेचे सभासद कार्यकारी मंडळास निवडून देतात. अशाप्रकारे महाविद्यालयामध्ये संस्थेच्या अध्यक्षाच्या मुलाने संस्थेशी काहीही संबंध नाही अथवा कुठल्याही पदावर नाही. फक्तवडील संस्थेचे अध्यक्ष आहे, याचा गैरफायदा घेऊन असे बेजबाबदार गैरकृत्य करणे चुकीचे आहे. आदित्य थोरे यांच्यावर कडक कारवाई करावी. या संस्थेचे कामकाज समाजातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी त्या त्या काळात सर्वांना विश्‍वासात घेऊन चालवले आहे. संस्थेला प्रगतीकडे घेऊन गेले. मात्र, पंढरीनाथ थोरे यांचे दोन-तीन वर्षांचे वादग्रस्त व मनमानी कामकाज बघता त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.
-ऍड. तानाजी जायभावे, सहचिटणीस

Bhagwat Udavant

Recent Posts

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून ‘ डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची आत्महत्या

सावकार वैभव देवरेच्या  जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा' फेम व्यावसायिकाची आत्महत्या सिडको विशेष प्रतिनिधी सावकारीच्या…

2 days ago

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे

चांदवड देवळा मधून डॉक्टर राहुल आहेर, तर नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे नाशिक/ काजी सांगवी…

2 days ago

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा

एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा भात शेतीचे  नुकसान, शेतकरी चिंतेत धामणगांव :   सुनील गाढवे पावसाचे माहेरघर…

3 days ago

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या.

फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या इंदिरानगर :  प्रतिनिधी इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ…

3 days ago

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच

हरियाणात जिंकले तरी महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होणारच खासदार अखिलेश यादव: मालेगावात समाजवादीची सभा मनमाड :…

4 days ago

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन नाशिक  ः प्रतिनिधी…

4 days ago