नाशिक

कांदा आवक घटूनही भावात सुधारणा नाही

शेतकर्‍यांमध्ये चर्चा; निफाड परिसरातील सद्यस्थितीचा आढावा

निफाड : आनंद जाधव
यंदा कांदा काढणीवेळी पावसाने लावलेली हजेरी आणि त्यानंतर झालेली अतिउष्णता यामुळे निफाडसह नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र, असे असतानाही आणि बाजारात कांद्याची अत्यल्प आवक होत असतानाही अपेक्षेप्रमाणे बाजारभावात सुधारणा होत नसल्याने “कांदा घटला तरी बाजारभाव का वाढला नाही?” अशी चर्चा शेतकरीवर्गात
सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने निफाड तालुक्यात उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. हा कांदा साठवून गरज भासेल तसा विकता येतो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून हे पीक जुगार ठरू लागले आहे. यावर्षी काढणीच्या वेळी पाऊस आणि मे महिन्यात विक्रमी उष्णतेमुळे शेतातील उन्हाळ कांदा सडला तरीही पुढे चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी तो चाळीत साठवला. मात्र, खराब वातावरणामुळे हा कांदा चाळीत फार काळ टिकला नाही.
बाजारभाव अन् प्रतवारी
सध्या लासलगाव आणि पिंपळगाव बाजारात कांद्याला 1000 ते 5100, तर सरासरी 4000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. सोलापूर बाजारात हाच भाव 6000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या मते, सध्या बाजारात येणार्‍या कांद्याची प्रतवारी घसरली आहे. जो उत्तम प्रतीचा कांदा 5000 ते 5500 रुपये भावाने विकला जात आहे, तो प्रामुख्याने बियाणे तयार करण्यासाठी वापरला जात आहे. अनेक शेतकर्‍यांनी उत्तम प्रतीचा कांदा अजूनही चाळींमध्येच राखून ठेवला आहे.

No improvement in prices despite a drop in onion arrivals.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

13 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

13 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

13 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

13 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

14 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

14 hours ago