मुंबई :
मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आगामी गणेशोत्सवात मूर्तींचे सुरक्षित आगमन आणि विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता एक टनापेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या गणेशमूर्तीसाठी ’योग्यता प्रमाणपत्र’ म्हणजेच ’फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
बीएमसी प्रशासनाने जड आणि मोठ्या मूर्तींच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यामध्ये गणेश मंडळांनी मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ती तयार होऊन मंडपात येईपर्यंतची संपूर्ण माहिती बीएमसीकडे नोंदवली जाणार आहे. जड मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अपघात होऊ नये, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावर बीएमसीचे पथक विशेष देखरेख ठेवणार
आहे.
यासंदर्भात सर्वसमावेशक नियमावली तयार करण्यासाठी डीएमसी (झोन 2) अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मूर्तींची सुरक्षा, फिटनेस प्रमाणपत्रे आणि वाहतुकीच्या नियमांना अंतिम रूप देण्यात आले.
रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश
दुसरीकडे, गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना आणि आगमन मिरवणुकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कडक पावले उचलली आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनासाठी वापरले जाणारे सर्व प्रमुख रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकार्यांना दिले आहेत.
Fitness certificate mandatory for Ganesh idols.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…