सिडको : विशेष प्रतिनिधी
उत्तमनगर सिडको येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत यशाची नवी शिखरे गाठली आहेत. विज्ञान विभागाचा निकाल 99.71 टक्के वाणिज्य विभागाचा 96.67 टक्के तर कला विभागाचा निकाल 95 .7 टक्के लागला.
या उल्लेखनीय यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपान कुशारे, उपप्राचार्य प्रा. सोमनाथ घुले, तसेच ज्युनिअर कॉलेजचे इंचार्ज प्रा. दीपक देवरे यांच्या योग्य मार्गदर्शनाला जाते. सर्व शाखांतील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
विज्ञान विभागात जयेश ईश्वर पाटील याने 89 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अनुजा भानुदास निकम (82.50%) आणि वैशाली गणेश गांगुर्डे (82.50%) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले.
कला शाखेत अर्पिता शेषराव सुलताने हिने 87.33 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. श्रद्धा सोमनाथ निगळ (82.17) आणि श्वेता भीमा शेलार (79.50) या अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर राहिल्या.
वाणिज्य विभागात सिद्धी साहेबराव खैरनार हिने 91 टक्के गुण मिळवत विभागात अव्वल स्थान पटकावले. निकिता आधार माळी (88 टक्के) आणि भाग्यश्री जितुभाई जाधव (87.50टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, मविप्र समाजाचे संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रेय दुसाने, आबा थोरात, सोपान बिडगर आदींनी अभिनंदन केले.
अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…
♦ मालेगाव जलदगती न्यायालयाचा निकाल ♦ पीडितेच्या वारसांना 10 लाखांची मदत ♦ अपहरण व पुरावा…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…