ऑनलाईन व्यवहाराचा व्याप; वृद्धांना ठरतोय ताप

डिजिटल सक्षरते अभावी फसवणूक प्रकारांत वाढ

नाशिक : अश्विनी पांडे 

केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात डिजिटल माध्यमातून होणार्‍या ऑनलाइन व्यवहाराला चालना दिली असून  कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात एटीएमचा वापरही वाढले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष बॅकेत जाऊन तासनतास रांगेत उभे राहत अर्थिक व्यवहार करण्याच्या ऐवजी मोबाईलच्या एका क्लिकवर अर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

डिजिटल माध्यमातून होणारे  व्यवहार तात्काळ  आणि सुसह्य झाले आहेत. कोरोना काळात ऑनलाइन व्यवहाराला अधिक महत्त्व आले. सोशल डिस्टन्सिंग पाळत व्यवहार करणे कोरोना काळात उपयोगी ठरले. मात्र या डिजिटल माध्यमातून होणार्‍या व्यवहाराचे  जसे अनेक फायदे त्याप्रमाणे तोटेही आहेत. तरूण वर्गाला डिजिटल व्यवहार एक वरदान ठरत असल तरी वृध्दांसाठी डिजिटल व्यवहार मात्र  अडचणीचे ठरू लागले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून होणार्‍या ऑनलाइन पेमेंट करण्याची पध्दत समजून घेण्यास वयस्कर लोकांना कठिण जात आहे. तसेच अनेक वयस्कर लोकांची डिजिटल पेमेंट करत असताना मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे वयस्कर नागरिक ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करण्यास घाबरतात. विशेष म्हणजे वयस्कर लोकांना ऑनलाइन व्यवहारात तर अडचणी येतच आहेत. मात्र बॅकेत जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करणेही तापदायक ठरत आहे. कारण बॅक कर्मचारी दहा हजाराहून कमी रक्कम बँकेतून देण्यात टाळाटाळ करत असतात.  त्यामुळे वयस्कर नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. एटीएम आणि ऑनलाइन व्यवहार जमत नाहीत.त्यात बॅकेत जाऊन व्यवहार करायचे म्हटल्यास पासबुक असूनही कमी रक्कम  बँकेतून काढून देण्यास टाळाटाळ करत असल्याने वृध्द नागरिक हैराण झाले आहेत. अर्थिक व्यवहार नेमके कसे करायचे असा प्रश्न वृध्दासमोर निर्माण झाला आहे.

वृद्धांसाठी तापदायक

कॅशलेस व्यवहार तरूण वर्गासाठी फायद्याचे ठरत असले तरी वयस्कर नागरिकांना ऑनलाइन  कॅशलेस व्यवहार करणे जिकरीचे ठरत आहे.

कॅशलेस व्यवहार वाढ

कोरोना काळात कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले.

बँकांमधील गर्दी झाली कमी

ऑनलाइन  व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने बॅकेत होणार्या गर्दीचे प्रमाण घटले आहे.  पुर्वी बॅकेत असणारी गर्दी आता काही प्रमाणात कमी असते.

पासबुकचा उपयोग कागदपत्रांसाठी !

बॅकिंक  व्यवहार करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना पासबुक दिले जाते. मात्र ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने पासबुकचा वापर कमी झाला आहे. गुगल पे, फोन पे सुरू करण्यासाठी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पासबुकचा वापर केला जात आहे.

चोरीचे प्रमाण घटले.

कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने  नागरिक पाकिटात  कमीत कमी प्रमाण पैसे ठेवतात. आणि पैसे लागल्यास ऑनलाइन माध्यमातून फोन पे अथवा गुगल पे चा वापर करत असतात.कदाचित याची चोरांना जाणिव झाली असावी म्हणून पाकिटमारीचे प्रमाण घटले आहे.

ऑनलाइन अर्थिक फसवणुकीत वाढ

प्रत्यक्षात चोरीचे पाकिटमारीचे प्रमाण कमी झाले असले तरी ऑनलाइन माध्यमातून अर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक झाल्याचे गुन्हे उघडकीस येत आहेत.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago