प्रमाणपत्राची पूर्तता न झाल्याने अर्ज प्रलंबित
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवाच्या महिनाभर आधी परवानगी घ्यावी, असे निर्देश देऊनही मंडळांकडून ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास यंदाही उशीर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच 691 गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले असता, त्यांपैकी अवघ्या 20 मंडळांनाच परवानगी मिळू शकली आहे. दरम्यान, मनपाने शुल्कमाफीची घोषणा केल्यानंतर अजार्र्ंचा ओघ शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिली.
गणेश मंडळांकरिता महापालिकेने सहाही विभागीय कार्यालयांत एक खिडकी योजना लागू करत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवली. मात्र, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम व पोलिस स्टेशनची एनओसीची पूर्तता न केल्यामुळे बरेच अर्ज प्रलंबित आहेत. शुल्कमाफीच्या निर्णयानंतर शनिवारी (दि.12) सर्वच मंडळांना परवानगी दिली जाणार आहे.
विभागानुसार अर्ज
विभाग एकूण अर्ज अंतिम परवानगी दिलेले अर्ज
सातपूर 164 02
नाशिकरोड 91 18
नाशिक पूर्व 78 00
नाशिक पश्चिम 74 00
पंचवटी 150 00
नवीन नाशिक 134 00
एकूण 691 20
महापौरांच्या आवाहनानंतर प्रतिसाद
महापालिकेने गुरुवारी गणेश मंडळांची बैठक बोलावली होती. तीत मंडप परवानगी शुल्कमाफीची घोषणा केल्यानंतर अर्जांचा ओघ वाढला आहे. बर्याच मंडळांनी महापालिकेच्या तयारीवर नाराजी व्यक्त केली आहे. खड्डे, अतिक्रमणांमुळे मंडळांना त्रास होत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला होता. दरम्यान, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी मंडळांचे शुल्क माफ करत त्यांना कुठलीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. यानंतर मात्र अर्जांची संख्या कमालीची वाढली आहे.
त्यावर जाहिरात शुल्क लागणार : आयुक्त
मंडप उभारणीकरिता अधिक दिवसांकरिता 750 रुपये शुल्क अनिवार्य आहे. तसेच एक दिवसाच्या मंडप, स्टेज परवानगीकरिता 15 रुपये प्रति चौरस मीटर व त्यावर जीएसटी 18 टक्के याप्रमाणे शुल्क आकारणी करून संबंधित विभागीय अधिकार्यांच्या स्तरावर परवानगी देण्यात येते. मंडळांकडून आकारले जाणारे मंडप शुल्क आकारले जाऊ नये, याबाबत महापालिकेने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार मनपा जागेवरील मंडप, स्टेज व कमानी इत्यादींचे शुल्क माफ केले आहे. मात्र, सार्वजनिक मंडळांनी वाणिज्य स्वरूपाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्यास त्या जाहिरातींच्या आकारमानानुसार परवाना शुल्क व जाहिरात कर भरावा लागेल, असे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटले आहे.
Only 20 out of 700 Ganesha Mandals granted permission.