ऐन हंगामात पावसाने दडी मारल्याने उत्पादनातप्रचंड घट शक्य
घोटी : प्रतिनिधी
पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका भातशेतीला बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे उशिरा आगमन, त्यानंतर पावसातील खंड आणि आता भातपीक पोटरी व फुलोर्याच्या अवस्थेत असताना पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उपलब्ध प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील भात उत्पादनात 80 ते 90 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इगतपुरी तालुक्यात एकूण 126 महसुली गावे आहेत. तालुक्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची नोंद 3,058 मिलिमीटर आहे. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ 1,267 मिलिमीटर पाऊस झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत सुमारे 42 टक्के पाऊस झाला आहे. पावसाची तूट जवळपास 58 टक्क्यांवर पोहोचली आहे. पावसाच्या या मोठ्या तुटीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर होत आहे.
यंदा भात लागवडीसाठी शेतकर्यांना 20 ते 25 दिवस विलंब सहन करावा लागला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने खंड दिल्याने भातपिकाला अपेक्षित फुटवे फुटले नाहीत. आता पीक दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने उत्पादनाच्या आशा मावळत आहेत. त्यामुळे भात उत्पादनात 80 ते 90 टक्क्यांपर्यंत घट होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. प्रत्यक्ष नुकसानीचे अंतिम चित्र पंचनाम्यांनंतर स्पष्ट होणार आहे.
दुष्काळ जाहीर; पंचनाम्यांना सुरुवात
राज्य शासनाच्या 25 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये इगतपुरी तालुक्याचाही समावेश आहे. त्यानंतर महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या माध्यमातून विविध गावांत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. शेतातील पिकांची सद्यःस्थिती, पावसाचे प्रमाण आणि नुकसानीची तीव्रता यांची पाहणी करून नोंदी घेतल्या जात आहेत. बियाणे, खते, मजुरी आणि शेतीच्या मशागतीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील शेतकर्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम अत्यंत कठीण ठरला आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन पंचनामे पारदर्शकपणे व वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. दुष्काळी उपाययोजनांचा लाभ पात्र शेतकर्यांपर्यंत तातडीने पोहोचवावा, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी.
– रमेश जाधव, प्रभारी सभापती, बाजार समिती, घोटीयंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्याने भात लागवडीवर परिणाम झाला. त्यानंतर पावसातील खंडामुळे भात पिकाला अपेक्षित फुटवे फुटले नाहीत. सध्या पीक पोटरी व फुलोर्याच्या अवस्थेत असताना पाण्याची कमतरता जाणवत आहे. याचा भात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीनुसार नुकसानीची नोंद केली जात आहे.
– रामदास मडके, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी
Paddy farming in Igatpuri taluka hit by drought.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…