नाशिक

निर्‍हाळेत एकाच दिवशी दोन बिबटे जेरबंद!

आठवडाभरात चार बिबटे पिंजर्‍यात

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराजवळील कोतवाल खोरा आणि निर्‍हाळे शिवारात लावलेल्या पिंजर्‍यांत शुक्रवारी (दि.9) दोन बिबटे जेरबंद झाले. गेल्या आठवडाभरात तालुक्यात चार बिबटे पिंजर्‍यात अडकल्याने शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक भागांत अद्याप बिबट्यांचे दर्शन होत असल्याने वनविभागासमोर त्यांचा वाढता वावर रोखण्याचे आव्हान कायम आहे. शेतशिवारापासून मानवी वस्तीपर्यंत बिबट्यांचा वावर वाढल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.
सिन्नर येथील गट क्रमांक 127 मधील मोहन शंकर कोतवाल यांच्या शेतातील कोतवाल खोरा परिसरात वनविभागाने पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे या पिंजर्‍यात अंदाजे चार वर्षांचा नर बिबट्या अडकला. त्याला माळेगाव येथील वनोद्यानात हलविण्यात आले असून, त्याच ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्यात आला आहे.
या परिसरात आणखी दोन बिबटे वास्तव्यास असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एक बिबट्या जेरबंद झाल्याने दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित बिबट्यांच्या वावरामुळे चिंता कायम आहे. उगले मळा परिसरातही दिवसा तीन बिबटे मुक्तपणे फिरताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर वनविभागाने सुमारे आठ दिवसांपूर्वी या भागात पिंजरा लावला होता. सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, संतोष चव्हाण, मधुकर शिंदे तसेच वनरक्षक सय्यद, मधुकर चव्हाण, आकाश रूपवते, निखिल वैद्य आणि रोहित शिंदे यांनी बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यासह आवश्यक
कार्यवाही केली.

निर्‍हाळेत दीड वर्षाची मादी अडकली

निर्‍हाळे शिवारातील निमोण रस्ता परिसरातही शुक्रवारी पहाटे दुसरा बिबट्या जेरबंद झाला. या भागात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी धास्तावले होते. गणपत बाबूराव सांगळे यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. शेतकर्‍यांच्या मागणीनंतर सुमारे पंधरा दिवसांपूर्वी लावलेल्या या पिंजर्‍यात अंदाजे दीड वर्षाची मादी बिबट्या अडकली. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबटे जेरबंद झाल्याने संबंधित परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तालुक्यातील इतर भागांतही बिबट्यांचा वावर असल्याने वनविभागाने गस्त वाढवावी आणि गरजेनुसार पिंजरे लावावेत, अशी मागणी होत आहे.

मक्याच्या शेतांचा आसरा; काढणी सुरू होताच वावर वाढला

खरीप हंगामात अनेक शेतांमध्ये मका उभा असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध झाली होती. आता विविध भागांत मका काढणी सुरू झाल्याने या पिकांमधील बिबट्यांचा अधिवास उघडा पडत आहे. त्यामुळे बिबटे शेतशिवारांत तसेच मानवी वस्तीजवळ दिसत आहेत. बिबट्यांच्या वारंवार होणार्‍या दर्शनामुळे शेतात काम करणारे शेतकरी आणि शेतमजूर यांना सतर्क राहावे लागत आहे. रात्री दुचाकीवरून प्रवास करणार्‍यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

 

Two leopards captured in Nirhale on the same day!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago