उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष, दिल्ली हायकोर्टाकडून नोटीस

नवी दिल्ली :
थ्री इडियट चित्रपटात आमिर खानने ज्यांची भूमिका साकारली ते सोनम वांगचुक थ्री इडियट चित्रपटाच्या माध्यमातून देशाच्या घराघरांत पोहोचले आहेत. रॅमन मॅगसेसे पुरस्कार पटकावल्याने त्यांचे कार्यदेखील देशाला परिचित आहे. मात्र, देशात झालेल्या नीट पेपरफुटीच्या घटनेविरोधात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. गेल्या 18 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या 18 दिवसांत त्यांचे वजन आठ किलोंहून अधिक कमी झाले आहे. मात्र, सरकारने अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने आता हे आंदोलन थेट कोर्टात पोहोचले आहे.
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही सोनम वांगचुक यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच अनेकांकडून वांगचुक यांच्या प्रकतीची काळजी व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. दिल्लीतील वकील राकेश कुमार सैनी यांनी वांगचुक यांनी उपोषण सोडावं म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत वांगचुक यांचा ’जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल’ घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. आता, न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटस बजावली आहे.
सोनम वांगचुक यांच्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचार, जीवनरक्षक मदत आणि आवश्यक पोषण पुरवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. त्यासोबतच सरकारने त्यांच्या आंदोलकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू करावी, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असतो, तेव्हा सरकार गप्प बसू शकत नाही. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे किंवा उपोषण करणे हा नागरिकांचा अधिकार आहे, परंतु त्याचवेळी आपल्या नागरिकांचा जीव वाचवणे ही सरकारचीही जबाबदारी आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

न्यायालयाने मागितले उत्तर

दरम्यान, दाखल याचिकेवर न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडून उत्तर मागितले असून, न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत उद्या या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले असून, सरकार उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेणार का, त्यांच्याशी चर्चा करणार का, हे पाहावे लागेल.

 

 

Wangchuk’s health has deteriorated.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

20 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

20 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

20 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

20 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

20 hours ago