नाशिक

राहुल गांधी आज नाशिक दौर्‍यावर

काँग्रेसच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप

नाशिक : प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज, बुधवार (दि. 2) नाशिकच्या एकदिवसीय दौर्‍यावर येत आहेत. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांंतर्गत नाशिकमध्ये 24 ऑगस्टपासून सुरू असलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा त्यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांसाठी आयोजित या शिबिरात संघटनात्मक बांधणी, पक्षाची विचारधारा, आगामी राजकीय आव्हाने आणि तळागाळातील संघटना मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. राहुल गांधी शिबिरातील प्रशिक्षणार्थी व जिल्हाध्यक्षांशी संवाद साधून संघटना अधिक सक्षम करण्याबाबत दिशा देणार आहेत.
गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी ग्रेप पार्क येथे हे निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील नेतृत्वाला जनतेच्या प्रश्नांंशी जोडणे, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे, या विषयांवर शिबिरात विविध सत्रांमधून मार्गदर्शन करण्यात आले. राहुल गांधी यांचे आज (दि. 2) सकाळी 11 वाजता नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते प्रशिक्षण शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दरम्यान, राहुल गांधी यांच्या आजच्या दौर्‍याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. यावेळी जागतिक राजकारण व भारत या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याबरोबरच नाशिकमधील आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या व प्रश्नांंवर या भेटीत चर्चा होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते संध्याकाळी दिल्लीकडे प्रयाण करतील.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, रेहाना चिश्ती, डॉ. विश्वजित कदम, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया, मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.राहुल गांधी यांच्या नाशिक दौर्‍याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळातील संघटनात्मक व राजकीय वाटचालीबाबत ते कोणता संदेश देतात, याची उत्सुकता आहे.

Rutuja Patil behind bars in paper leak case.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

4 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

4 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

4 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

5 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

5 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

5 hours ago