मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ड्रग्स इन्स्पेक्टर भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या सेलने मुख्य आरोपी उमेदवार ऋतुजा पाटीलला नंदुरबारमध्ये ताब्यात घेतले आहे. परीक्षेत सातवा क्रमांक मिळवलेल्या ऋतुजाचे नाव समोर आल्यापासून ती पोलिसांच्या रडारवर होती. गुन्हे शाखेचे डीसीपी राजतिलक रोशन यांनी मंगळवारी (1 सप्टेंबर) याला दुजोरा दिला. या प्रकरणात एमपीएससीच्या अधिकार्यांसह 6 आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी तिला प्रश्नपत्रिका कशी मिळाली? त्यामागील नेटवर्क आणि त्यात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का? हे निश्चित करण्यासाठी पोलीस आता ऋतुजाची चौकशी करत आहेत.
हे प्रश्न गौरवने फोडले की ऋतुजाला ते तिच्या वडिलांकडून मिळाले? हे एक गूढच राहिले आहे. गौरवने एमपीएससीला ईमेलदेखील केला. तथापि 26 जुलै रोजी गौरवने आपले आरोप मागे घेतले आणि एमपीएससीनेही पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावले. पण ऋषिकेशने आपला लढा कायम ठेवला. ऋषिकेशने डिजिटल पुराव्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला. वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावानंतर एमपीएससीने मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याची विनंती केली. मुंबई पोलीस आयुक्तांनी तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. गुन्हे शाखेने डिजिटल पुराव्यांची तपासणी करून अनियमितता उघडकीस आणल्यानंतर आयोगाला अखेरीस परीक्षा रद्द करण्यास भाग पडले. त्यानंतर ऋतुजाचा माजी प्रियकर, तिचे वडील आणि एका एमपीएससी अधिकार्यासह सहा आरोपींना अटक करण्यात आली.
कट-ऑफ यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
हे संपूर्ण प्रकरण जुलैमध्ये सुरू झाले, जेव्हा ऋषिकेश बांगर्डे पाटीलने आयोगाने जाहीर केलेल्या कट-ऑफ यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऋषिकेशने परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर ऋतुजाचा माजी प्रियकर गौरव पाटीलने ऋषिकेशशी संपर्क साधला आणि व्हॉट्सप चॅट्सचे पुरावे दिले. त्यावरून हे उघड झाले की, 22 मार्च रोजी होणार्या परीक्षेच्या दोन दिवस आधी सुमारे 80 टक्के प्रश्न फुटले होते.
Rutuja Patil behind bars in paper leak case.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…