कौडासर येथे वीजवाहक तार तुटून पडल्याने महिलेचा मृत्यू
दिंडोरी / ननाशी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यात दुसर्या दिवशीही वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यात अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच दिंडोरी तालुक्यातील कौडासर येथे अवकाळी पावसामुळे 11 केव्ही वीजवाहक तार तुटून शेतात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ व श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात आक्रमक भूमिका घेत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माया दिगंबर वाघेरे (वय 35, रा. कोहोर, ता. पेठ) या आपल्या नातेवाइकांकडे कौडासर येथे पाहुण्या म्हणून आल्या होत्या. कृष्णा पुंडलिक राऊत यांच्या शेतात काकडी वेल बांधणीचे काम सुरू असल्याने त्या मदतीसाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोर धरला. त्याचवेळी ननाशी-पिंपळगाव धूम मार्गावरील 11 केव्ही वीजवाहक तार तुटून थेट शेतात पडली. वीजवाहिनीचा जोरदार धक्का बसल्याने माया वाघेरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकला कृष्णा राऊत (वय 50) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून, त्यांच्यावर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. वीजवाहिन्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा
ग्रामस्थांनी घेतला.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तसेच पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अखेर महावितरणच्या पेठ विभागाचे सहाय्यक अभियंता कुमावत यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे कौडासरसह परिसरात शोककळा पसरली असून, महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Rains cause damage to houses and agriculture in Dindori taluka
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…