महाराष्ट्र

महायुतीत अस्वस्थता; ‘मोठ्या भावा’कडून कोंडी?

सत्तार, गायकवाड ते गुलाबराव पाटलांपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेत भाजपविरोधात असंतोष

मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 17 जागांची निवडणूक घातली असतानाच, महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.
जागावाटपात भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर मित्रपक्षांकडूनच झालेली अंतर्गत बंडखोरी यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये भाजपविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. आधी मंत्री अब्दुल सत्तार, त्यानंतर आमदार संजय गायकवाड आणि आता थेट जळगावातून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे, भाजप जाणीवपूर्वक शिवसेनेची कोंडी करून पक्ष संपवू पाहत आहे, अशी भावना बळावत चाललेली दिसत आहे.
भाजपाने 17 जागांपैकी स्वतःकडे 11 जागा घेतल्या, तर शिवसेनेची सात जागांची मागणी उडवून लावतील अवघ्या चार जागा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. जागांच्या या वाटणीमुळे शिवसैनिकांमध्ये आधीच नाराजी होती. त्यात भर म्हणून शिवसेनेला मिळालेल्या मोजक्या जागांवरही अंतर्गत बंडखोरी घडवून आणल्याचे चित्र आहे. नाशिकच्या उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या जागेवर ही कोंडी प्रकर्षाने समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष बंडखोरी जाहीर केली आहे. जळगावातही मोठी खदखद आहेच. जळगावातील हक्काची जागा शिवसेनेला हवी असताना, भाजपने ती स्वतःच्या पारड्यात पाडून घेतली. या सातत्यपूर्ण डावलणुकीमुळे, सोबत राहून पाठीत खंजीर खुपसला जात आहे, अशी भावना शिवसेना आमदारांमध्ये एकापाठोपाठ एक येणार्‍या वक्तव्यांमधून स्पष्टपणे उमटू लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांमधील ही खदखद सर्वात आधी छुप्या पद्धतीने आणि आता थेट जाहीर वक्तव्यांमधून बाहेर पडत आहे. अब्दुल सत्तार यांचा पहिला आक्षेप: अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील विकासनिधी आणि स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांकडून होणार्‍या हस्तक्षेपाबाबत जाहीर व्यथा मांडत महायुतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
जळगावात गुलाबराव पाटलांचा थेट असहकार- या संपूर्ण वादाचा सर्वात मोठा स्फोट नाशिकसह जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून होताना दिसत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे ही जागा शिवसेनेला सुटावी आणि तेथून त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा न करता नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी जाहीर केली.या एकतर्फी निर्णयामुळे संतापलेल्या गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील इतर शिवसेना आमदारांनी थेट बंड पुकारत भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पूर्णपणे पाठ फिरवली. मंत्र्यांनीच उघडपणे असहकार पुकारल्याने भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. अखेर डॅमेज कंट्रोलसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांना थेट गुलाबराव पाटलांचे गाव ’पाळधी’ गाठावे लागले. तेथे बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर हा वाद शमवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी भाजप शिवसेनेची कोंडी करत आहे हा संदेश संपूर्ण राज्यभरात गेला आहे. भाजपवर सडकून टीका करताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, महायुतीमध्ये सोबत असताना जागावाटपात विश्वासात घेणे अपेक्षित होते, मात्र भाजपने स्वतःच्याच सोयीचा निर्णय घेत शिवसेनेवर अन्याय केला आहे. मित्रपक्षाला कमकुवत करण्याच्या कथित प्रवृत्तीमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

आमदार गायकवाड यांचा पाठिंबा

सत्तार यांच्या या नाराजीला बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर दुजोरा दिला. गायकवाड यांनी थेट माध्यमांसमोर सांगितले की, अब्दुल सत्तार जे बोलले ते 100 टक्के सत्य आहे. आमच्या हक्काच्या मतदारसंघात मित्रपक्ष जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Unease in the Grand Alliance; Confusion from ‘Big Brother’?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago