लखनौ : प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणगीच्या रकमेत आणि प्रसादात कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांच्या तक्रारीवरून अयोध्येत नुकताच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, यामध्ये अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, टिन्नू यादव, मनीष यादव आणि इतर आरोपींचा समावेश आहे. सुमारे 7 ते 7.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी 14 जून रोजी त्रिसदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. एसआयटीच्या प्राथमिक तपासणीनंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Ram Mandir donation misappropriation; eight arrested.
नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…
तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…
रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…
पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…
अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…