महाराष्ट्र

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार

महिलेचे  अश्लील फोटो  व्हायरल करण्याची

धमकी देत वेळोवेळी  लैंगिक अत्याचार

नाशिक : प्रतिनिधी

ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत २०२२ पासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली, याप्रकरणीकोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील अर्जुन देवकर (रा.टाकळी, कोपरगांव) याच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २२/२०२२ रोजी फिर्यादी हिच्या पार्लर व्यवसयासाठी आरोपी याने रुपये ५ लाख रुपये उसनवारी दिले. असता आरोपी याने पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसून फिर्यादीचे नग्न अवस्थेत फोटो काढून सदर फोटो हे व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.  फिर्यादी हिच्या २०२२ रोजी पार्लर मध्ये त्याच बरोबरी   धारणगाव रोड येथील ऑफिसवर आणि नाशिक येथील एका लॉजवर बळजबरीने     शारीरिक संबंध ठेऊन धमकावले असता फिर्यादी हिने आरोपी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या प्रमाणे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वी कलम ३७६ (२) (N),५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी  आरोपीला अटक करून .विशेष तथा अति. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांचे समक्ष  रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी हजर केले असता .न्यायालयाने  आरोपी यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील घटनेचा  तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

रस्ता झाला खोल, चेंबरचा झोल

गंगापूर रोडवर वाहने चालवणार्‍यांची पंचाईत नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे रूप पालटत…

28 minutes ago

त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावरील वाहतुकीत बदल

गर्डरच्या कामासाठी पिंपळगाव बहुला पूल चार दिवस बंद नाशिक : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर मार्गावरील पिंपळगाव बहुला…

37 minutes ago

कुंभनगरीच्या स्वच्छतेवर तंत्रज्ञानाची नजर

67 कोटींचा आराखडा; निर्माल्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचे उद्दिष्ट नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची…

44 minutes ago

रविवार मिसळवार…पण गर्दीला कारवाईचा फटका

नाशिक : प्रतिनिधी नाशिककरांचा रविवार म्हणजे मिसळवार! रविवारची सकाळ झाली की, शहरातील मिसळच्या हॉटेल्समध्ये खवय्यांची…

53 minutes ago

’एफडीए’च्या धसक्याने अनेक हॉटेल्सचे शटर्स डाउन!

काहींनी नूतनीकरणासाठी तात्पुरत्या बंद ठेवल्या आस्थापना नाशिक : प्रतिनिधी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा…

1 hour ago

शिवतीर्थावर ‘सिहस्थ कुंभमेळा’ थीमवरील भव्य दीप सोहळा

नाशिक : प्रतिनिधी राजमुद्रा सोशल फाउंंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित 10 वा अर्थात दशकपूर्ती दीपोत्सव…

1 hour ago