मुंबई : माजी मंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. दोघांच्याही जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. देशमुख यांचा जामीन सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला तर राऊत यांच्या जामीनावरील सुनावणी आता 2 नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे.
गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (21 ऑक्टोंबर) सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने 2 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही. तर कथित 100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुखयांना काही दिवसांपूर्वीच ईडीच्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, आज सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी यंदाही तुरुंगातच जाणार आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…