मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळला
सिन्नर : प्रतिनिधी
भक्तिमय वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई आणि नामवंत महिला कीर्तनकारांच्या स्वरांतून होणारा भक्तिप्रबोधनाचा जागर… अशा उत्साही वातावरणात तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील ग्रामदैवत श्री रेणुकामाता शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार(दि. 11)पासून प्रारंभ होत आहे. उत्सवानिमित्त सलग दहा दिवस कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाविकांना भक्तिरसाची अनुभूती देणार आहेत.
श्री रेणुकामाता मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर संकुलातील सहा मंदिरांचे गाभारे आणि कलशांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सजावटीमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. कीर्तन महोत्सवासाठी रेणुकामाता पटांगणात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
परिसरातील जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून श्री रेणुकामाता प्रसिद्ध आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. गतवर्षापासून गावातील युवक आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने महिला कीर्तनकारांच्या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे.
रोज कीर्तन, महाआरती आणि महाप्रसाद
रविवारी सकाळी 11 वाजता घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. उत्सवकाळात दररोज सकाळी व सायंकाळी देवीची महाआरती, रात्री 7 ते 9 या वेळेत कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले
जाणार आहे.
रेणुकामाता नवरात्रोेत्सव समिती, भजनी मंडळ, महिला मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील भाविकांनी कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 19) ह.भ.प. माधव महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने नामसप्ताहाची सांगता होणार आहे.
महिला कीर्तनकारांची मांदियाळी
11 ऑक्टोबर : ह.भ.प. ज्योती सोनवणे, 12 ऑक्टोबर : ह.भ.प. सविता केकाण (मुंढे), 13 ऑक्टोबर : ह.भ.प. वनिताताई पाटील, 14 ऑक्टोबर : ह.भ.प. राणीताई दौंड, 15 ऑक्टोबर : ह.भ.प. सुनीता आंधळे, 16 ऑक्टोबर : ह.भ.प. आरती शिंदे, 17 ऑक्टोबर : ह.भ.प. नेहाताई भोसले, 18 ऑक्टोबर : ह.भ.प. ज्योती धानोडे.
Renukamata Navratri festival celebrations in full swing at Nandursingote!
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…