बेपत्ता भारतीयांची चिंता कायम

मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर नुकत्याच आलेल्या विनाशकारी जलप्रलयामुळे मोठे नुकसान झाले आहे. आपत्कालीन यंत्रणांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी चौथ्या दिवशीही बचावमोहीम वेगाने सुरू आहे. 21 ऑगस्टच्या सुमारास तिबेटमधील एक धरण फुटल्याने आणि त्याचवेळी झालेल्या भूकंपामुळे निर्माण झालेल्या महापुरात रस्ते, पूल आणि सीमावर्ती चौक्या पूर्णपणे वाहून गेल्या. या प्रलयामुळे नेपाळ आणि तिबेटमध्ये मिळून मृतांची संख्या 350 च्या पुढे गेली असून अद्यापही जवळपास 1,900 हून अधिक जण बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 320 पेक्षा जास्त भारतीय नागरिक सध्या बेपत्ता आहेत, ज्यात कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या भाविकांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारत सरकारने मदत म्हणून नेपाळला 57 टनांपेक्षा जास्त आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि बचाव साहित्य पाठवले असून, हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या साहाय्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
या जलप्रलयात महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकही अडकले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 404 पैकी 299 पर्यटकांशी यशस्वी संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत.यापैकी 105 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत, मात्र अद्याप 60 हून अधिक पर्यटकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. विशेषतः मुंबईतील ’हिल्स अँड ट्रेल्स’ आणि ’रिचा टूर्स’ च्या माध्यमातून कैलास मानसरोवरला गेलेल्या तीन बसेसमधील सुमारे 66 भाविक बेपत्ता आहेत. हे प्रवासी नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे इमिग्रेशन सेंटरजवळ असतानाच महापूर आला, ज्यामुळे हे केंद्र आणि आजूबाजूचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यातील नागरिकांचा मोठा भरणा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता आणि धास्तीचे वातावरण आहे.

राज्य सरकार प्रयत्नशील

परदेशात अडकलेल्या या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलली असून, मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. बेपत्ता नागरिकांच्या नातेवाइकांना अद्ययावत माहिती देण्यासाठी +91-9321587143 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. राज्य सरकार भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि नेपाळमधील दूतावासाच्या सतत संपर्कात आहे. दरम्यान, चीनच्या सीमेवर अडकलेल्या उर्वरित 400 भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत बचावमोहीम राबवली जात आहे.

Rescue operations continue in Nepal.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

19 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

19 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

19 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

19 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago