फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओविषयी तांत्रिक चुकीच्या नावाखाली आपला बचाव केला असला, तरी लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काढून टाकून मेटाने एक गंभीर चूक केली. व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह काहीच नव्हते, तरीही तो का काढून टाकण्यात आला? यावर देशभर चर्चा झाली/होत आहे. व्हिडिओ काढून टाकण्याचे तांत्रिक कारण मेटाने पुढे केले असले, तरी नेमके तांत्रिक कारण स्पष्ट केले नाही. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर युवकांशी तातडीने संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. मेटाने तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा व्हिडिओ फेसबुकवरून चुकीने हटवला. ही कारवाई कोणत्याही धोरणांतर्गत किंवा जाणीवपूर्वक करण्यात आली नव्हती, तर ती एक तांत्रिक त्रुटी होती, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले. हा व्हिडिओ चुकीने ब्लॉक झाला होता. एआय-आधारित ऑटोमेटेड मॉडरेशन फिल्टरने (एआय कंटेंट फिल्टर) चुकीच्या फ्लॅगमुळे हा व्हिडिओ ब्लॉक केला असावा, असे मेटाच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन जारी करून सांगितले. व्हिडिओ ब्लॉक असताना भारतात वापरकर्त्यांना ‘कायदेशीर विनंतीमुळे उपलब्ध नाही’ असा संदेश दाखवला जात होता. हा संदेश देखील तांत्रिक चुकीमुळेच दिसत होता, असेही मेटाने स्पष्ट केले. हा व्हिडिओ 23 जुलै रोजी पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरकार कडक कायदे आणणार असल्याचे आश्वासन दिले होते. चूक लक्षात येताच मेटाने तो व्हिडिओ फेसबुकवर पुन्हा पूर्ववत केला आणि या अनपेक्षित प्रकाराबद्दल भारत सरकारची अधिकृत माफी मागितली. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. व्हिडिओ अचानक ब्लॉक कसा झाला, याचे सविस्तर स्पष्टीकरण मागवण्यासाठी मंत्रालयाने मेटा आणि इन्स्टाग्रामच्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी प्रमुखांना समन्स बजावले. मेटा कंपनीने सार्वजनिक निवेदनात केवळ तांत्रिक त्रुटी एवढाच मोघम शब्द वापरला आहे. त्या तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरूप काय होते, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. याच मोघम स्पष्टीकरणामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. केवळ तांत्रिक चूक म्हणून हे प्रकरण संपत नाही, यामागील मूळ कारण समोर आले पाहिजे, अशी ठाम भूमिका सरकारने घेतली आहे. तांत्रिक कारण लपवल्यामुळे आयटी तज्ज्ञ आणि सरकारकडून शंका उपस्थित करणे स्वाभाविक आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत अकाउंटवर ऑटो-फिल्टर कसे लागू झाले, हा प्रश्न कायम आहे. या लपवाछपवीमुळेच सरकारने थेट अमेरिकेतील मेटा आणि इन्स्टाग्रामच्या ग्लोबल प्रमुखांना समन्स पाठवून भारतात पाचारण केले आहे. संबंधित प्रणालीमध्ये नेमकी कुठे चूक झाली, हे शोधण्यासाठी सरकार आता मेटाकडून तांत्रिक लॉग्स आणि लेखी सविस्तर अहवाल मागवून घेत आहे. या प्रकरणाचे सविस्तर तांत्रिक कारण मेटाने सरकारला सादर केल्यानंतरच ते अधिकृतपणे समोर येईल. दिनांक 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला होता, जो नंतर फेसबुकवरही पोस्ट करण्यात आला. मेटाने दिलेले स्पष्टीकरण तर्कसंगत नाही. मेटाकडून तांत्रिक चूक झाली असली, तरी ती पंतप्रधानांच्या बाबतीत झाली असल्याने सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. पंतप्रधानांचा व्हिडिओ का दिसत नाही, किंवा का काढला गेला, हाच प्रश्न उपस्थित होत होता. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांनी पोस्ट केलेला व्हिडिओ दिसत नाही किंवा काढून टाकला गेल्याने मोठा गैरसमज झाला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर युवकांशी संवाद साधण्यासाठी अत्यंत तातडीने व्हिडिओ बनवण्यात आला, तो 23 जुलैच्या मध्यरात्री पोस्ट करण्यात आला. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला, त्यांतील अनेकांनी व्हिडिओतील तांत्रिक दोष समोर आणून दिले. अँगल्स, एडिटिंग, पार्श्वभूमी, भाषा, शब्द यांत चुका असल्याचे समोर आले. मोदी विरोधकांनी या चुका समोर आणल्या. त्यांवर बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि आजही होत आहे. ते काहीही असो, पंतप्रधानांचा व्हिडिओ काढून मेटाने चूक केली. ती तांत्रिक असली, तरी ती चूक आहे. ती मेटाने मान्य केली. अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत मेटाकडून अशी तांत्रिक चूक झाली असती, तर मोठा गहजब झाला असता. भारतात मेटाने लोकांमध्ये गैरसमज पसरवून दिला.
Technical error
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
वडाळागाव : प्रतिनिधी नाशिकच्या द्वारका परिसरात गुरुवार (दि. 30) रोजी पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या चिखल व…