मुख्यमंत्र्यांची घोषणा : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिलासा
मुंबई :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी होत आहे. आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस पडला असून, हा सरासरीच्या 102 टक्के अधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीने मदत दिली जाईल. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही. आतापर्यंत राज्य सरकारने 31 लाख 64 हजार शेतकर्यांना 2,215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत. यांपैकी 1,829 कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आले. विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणार्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय
आरोग्य विभाग- राखीव निधी शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी, तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला मिळणार. निधीचा विनियोग करण्यास विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेतून रुग्णाच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणार्या मंजुरी.
महसूल विभाग- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाशिकरोड यांना मौजे देवळाली (ता.जि. नाशिक ) येथील 1055.25 चौ.मी. जमीन देण्यास मान्यता
परिवहन विभाग- रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला नागपूर-नागभीड गती.
पैसे तातडीने देणार
राज्य सरकारने शेतकर्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. सगळे पंचनामे झाल्यावर एकत्रित मदत करण्याऐवजी जसे पंचनामे होतील, तशी तातडीने मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने अवलंबिले आहे. आम्ही सातात्याने जीआर काढत आहोत, एक सिंगल जीआर नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आतापर्यंत शेतकर्यांसाठी 1,829 कोटी रुपयांची मदत ग्राउंंडवर पोहोचली आहे. पण यासोबत नवीन ठिकाणी पाऊस सुरू आहे, तेथील पंचनामे करुन मदत करण्याचे काम सुरुच राहील.
मंत्री करणार पूरग्रस्त भागांत दौरे
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आज (दि. 24 सप्टेंबर) सर्व पालकमंत्र्यांसह मंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मी स्वतः काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. मात्र, मदतकार्यावर ताण येऊ नये, यासाठी दौर्यांचे नियोजन काळजीपूर्वक केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…