नाशिक

संततधारेमुळे गोदावरीच्या पातळीत वाढ

दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी, नागरिकांना इशारा

पंचवटी : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर परिसरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीची पातळी मंगळवारी (दि. 23) दुपारी पुन्हा वाढली. गोदावरीच्या पुराचे मापक समजल्या जाणार्‍या दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागले आहे. गोदाकाठी राहणार्‍या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात मे महिन्यापासून सातत्याने पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली आहेत. धरणातून सातत्याने विसर्ग होत असल्याने मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरणही तीन वर्षांनंतर भरले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून मराठवाड्याकडे विसर्ग सुरूच आहे. संततधारेमुळे यंदा श्रावण, गणेशोत्सव पावसात गेल्यानंतर सोमवारी घटस्थापना होत असताना पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले. नाशिकमध्ये यलो अलर्ट असतानाच सोमवारी दीड तासांत 37 मिलिमीटर पाऊस झाला.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पाऊस झाल्याने आता नऊ दिवस पावसाची शक्यता ज्येष्ठांंनी बोलून दाखवली. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस होत असल्याने धरणातून विसर्ग सुरू असल्याने मंगळवारी गोदावरीची पातळी पुन्हा वाढली. गोदाकाठची लहान मंदिरे, तसेच सांडवे पाण्याखाली गेले असून, पावसासह पाण्याची पातळी जैसे थे राहिल्यास उद्या भरणारा बुधवारचा बाजार गणेशवाडीत स्थलांतरित करावा लागणार आहे. पावसामुळे भूमिगत गटारीही उफाळल्या असून, सांडपाणी गोदावरी नदीच्या पाण्यात मिसळले जात आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

5 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

5 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

5 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

6 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

6 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

6 hours ago