filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0;
वाहनधारकांची कामे रखडली; सामान्यांना फटका
पंचवटी : प्रतिनिधी
मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपावर शासनाने कुठल्याही प्रकारचे पाऊल न उचलल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांचे पासिंग, शिकाऊ व पक्के परवाने ही कामे वगळता इतर अनेक कामे बंद असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य वर्गाला बसला. त्यामुळे शासनाच्या महसुलावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीतील प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल, या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचार्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून रास्त प्रलंबित मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने प्रयत्न केले. त्याबाबत दि. 17 एप्रिल 2026 रोजीच्या पत्राद्वारे तात्पुरत्या पदोन्नतीस मुदतवाढ मिळण्याबाबत कर्मचार्यांच्या भावना कळविल्या होत्या. मात्र, काहीच कार्यवाही न झाल्याने संपाचे हत्यार उपसण्यात आले. मागण्यांवर कुठल्याही प्रकारे तोडगा न निघाल्याने कर्मचारी मंगळवार(दि. 16 जून 2026)पासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा पहिलाच दिवस असल्याने मोटार वाहन विभागाच्या सर्वच कर्मचार्यांनी पाठ फिरवल्याने आरटीओ कार्यालयाच्या आवारात पूर्णतः शुकशुकाट दिसून आला.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सचिव श्रीमती शिरीन शहा, जितेंद्र देसाई, शिरीष सोनवणे, प्रशांत जाधव, अनुप वाघ, पंढरीनाथ आडके, कविता मोराडे, शंकर दिवटे, हर्षल माळी, रूपाली म्हस्के, कांचन उमराणकर, पंडित जाधव, वनिता पवार, आरती हरळ आदींसह जवळपास 40 ते 50 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात केवळ मोजके एजंट दिसून आले. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनी पाठ फिरवली होती.
ही कामे थांबली
♦ वाहन हस्तांतरण कामकाज पूर्णतः ठप्प
♦ वाहनावर असलेला बँकेचा बोजा चढवणे व उतरवणे पूर्णतः बंद
परमिट नूतनीकरण बंद
♦ पंधरा वर्षांवरील पुढील वाहनांच्या पासिंगचे काम ठप्प
♦ आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट बंद
♦ व्यावसायिक वाहनांचा कर भरणे
कर्मचार्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
शासनाकडे कर्मचार्यांनी केलेल्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे रास्त व जिव्हाळ्याच्या मागण्या संवेदनशील प्रशासनाने मान्य कराव्यात.
– ज्ञानेश्वर करंजकर, अध्यक्ष, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना
RTO office in chaos due to employee strike
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…