महाराष्ट्र

रूपाली चाकणकर यांची आठ तास ईडी चौकशी

खरात प्रकरणामुळे अडचणीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची गुरुवारी (दि. 14) अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून आठ तास कसून चौकशी करण्यात आली. सकाळी 10.30 च्या सुमारास त्या मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.
स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ही चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरा बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले.
या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकार्‍यांनी चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विशेषतः नाशिकमधील शिवानिका संस्था या ट्रस्टमध्ये त्यांची भूमिका, अशोक खरात याच्याशी असलेले आर्थिक संबंध आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित बनावट खात्यांबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. याशिवाय, मागील काही काळातील त्यांचे दौरे, गुवाहाटी हॉटेल दौरा आणि खरातच्या संस्थांशी असलेले हितसंबंध यावरही तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. अशोक खरात याच्यावर बलात्कार, फसवणूक आणि काळ्या जादूचे गुन्हे दाखल असून, त्याच्या आर्थिक साम्राज्यात चाकणकर यांचा सहभाग आहे का, याचा तपास ईडी करत आहे.
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यापूर्वी विशेष तपास पथक (एसआयटी) ने देखील त्यांची सहा तास चौकशी केली होती. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खरात यांच्याशी आमचे संबंध केवळ आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांपुरते होते, कोणताही आर्थिक किंवा जमिनीचा व्यवहार आम्ही केलेला नाही, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांचीही नावे समोर आल्याने आगामी काळात त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rupali Chakankar questioned by ED for eight hours

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago