‘सातारा’प्रश्नी सत्ताधार्‍यांमध्ये गदारोळ

मंत्री देसाईंना पोलिसांकडून मारहाण प्रकरण गाजले, एसपींच्या निलंबनाचे निर्देश

मुंबई :
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ उडाला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरल्याची घटना घडली होती. प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या अभूतपूर्व गोंधळाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाला कडाडून विरोध केला. यामुळे विधान परिषदेत सत्ताधार्‍यांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे दिसून आले. जयकुमार गोरे म्हणाले की, सभापती महोदया तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे होते. तत्पूर्वी, तुम्ही
निर्देश दिले. ज्याचं अपहरण झालं तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद केला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे करण्याचे काम कुणी केले. चार हजार लोकं जिल्हा परिषदेत घुसले ते कुणी आणले? याचे देखील उत्तर द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले. जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, वस्तुस्थिती जाणून न घेता एका अधिकार्‍याला निलंबित करता कसं काय? तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे. तुम्ही असा कसा निर्णय घेतला? तुमच्या निर्णयावर हरकत नाही. मात्र, जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे.

तीनही पक्षांच्या प्रमुखांची फडणवीसांसमवेत बैठक

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून विधिमंडळातही राडा झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं दिसून आले. यामुळे विरोधकांनाही सत्ताधार्‍यांवर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न गंभीरतेने घेतला असून, तीनही पक्षांच्या प्रमुखांची वर्षा या निवासस्थानी बैठक होणार आहे. सातार्‍याच्या मुद्द्यावरून तीनही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद मिटवून समन्वय ठेवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनिल परब- शंभूराज देसाई भिडले

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या राड्याचे पडसाद आता राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आहेत. या निवडणुकीदरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आपल्याला खेचत नेल्याने हाताला दुखापत झाल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाचे उपनेते अनिल परब यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांना ‘लाथ मारून सत्तेबाहेर पडा,’ असे आव्हान देत डिवचण्याचा प्रयत्न केला.

‘Satara’ issue creates chaos among those in power

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago