नाशिक

सिग्नलवर दुचाकीस्वारांसाठी सावली

सिडकोतील त्रिमूर्ती चौकात ‘हीट शेल्टर’

सिडको : प्रतिनिधी
एकेकाळी आल्हाददायक आणि थंड हवामानासाठी ओळखले जाणारे नाशिक आता वाढत्या तापमानाच्या झळा सोसू लागले असून, यंदाच्या उन्हाळ्यात उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. दैनंदिन कामकाज, नोकरी आणि उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडणे अपरिहार्य असताना विशेषतः दुचाकीस्वारांना कडक उन्हाचा मोठा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सिग्नलवर काही क्षणांची का होईना सावली मिळावी, या उद्देशाने सिडकोतील त्रिमूर्ती चौकात ‘हीट शेल्टर’ उभारण्याचा अभिनव संकल्प नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. या उपक्रमामागील संकल्पना युवानेते दीपक बडगुजर यांची असून, ‘थोडीशी विश्रांती, सावलीसोबत’ ही अर्थपूर्ण टॅगलाइन देण्यात आली आहे.
नाशिकचा पारा यंदा 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागल्याने शहराच्या हवामानात झालेला बदल प्रकर्षाने जाणवू लागला आहे. पूर्वी एसी किंवा कूलरची गरज क्वचित भासणार्‍या नाशिकमध्ये आता घराघरांत शीत उपकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. उष्णतेची सवय नसलेल्या नागरिकांना बाहेर पडताना विशेष त्रास सहन करावा लागत असून, सिग्नलवर एक ते दोन मिनिटांची प्रतीक्षादेखील आरोग्यास धोकादायक ठरू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
याच जाणिवेतून त्रिमूर्ती चौकात प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणारे हे ‘हीट शेल्टर’ नाशिक शहरातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे. सिग्नलवर थांबणार्‍या वाहनचालकांना क्षणभर सावलीचा आधार देत उष्णतेपासून दिलासा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे, अशी माहिती दीपक बडगुजर यांनी दिली.

टप्प्याटप्प्याने इतर सिग्नलवरही सुविधा देणार

हा प्रयोग यशस्वी ठरल्यास टप्प्याटप्प्याने शहरातील इतर प्रमुख चौक आणि सिग्नलवरही अशा प्रकारची सुविधा उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरी सोयीसुविधांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरणार असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात थोडासा दिलासा देणारा हा प्रयत्न नाशिककरांसाठी स्मरणीय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shade for bikers at signals

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago