काजी सांगवी : वार्ताहर
केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी संतप्त झाला आहे शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे आज सकाळी रास्ता रोको सुरू झाला आहे.
आज चांदवड येथिल मुबंई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करत आहे चांदवड तसेच राज्यातील शेतकरी आधीच अवकाळी आणि दुष्काळने कंबरडे मोडले आहे अश्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे . त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात येत आहे, या आंदोलनात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे ,शहराध्यक्ष गजानन शेलार ,श्रीराम शेटे ,माजी आमदार उत्तम बाबा भालेराव,, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल ,शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, तालुका अध्यक्ष विलास भवर, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, नवनाथ आहेर ,शैलेश ठाकरे ,अनिल पाटील,दत्ता वाकचौरे, प्रकाश शेळके ,तुकाराम सोनवणे, रिजवान घाशी ,समाधान जामदार, कारभारी आहेर, नरेंद्र ठाकरे, तुषार शेवाळे, येवल्याचे माणिकराव शिंदे आदी सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…