ठेकेदारांना बजावल्या नोटिसा
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 29 रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. 31 मार्च 2027 पर्यंत या कामांना डेडलाइन देण्यात आली आहे. दरम्यान, काही ठेकेदारांकडील कामे संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ठेकेदारांना कारवाईचा इशारा देत नोटिसा धाडल्या आहेत. दिलेल्या मुदतीत कामे मार्गी लावा, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा संबंधितांना दिला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी प्राधिकरणामार्फत शहरातील रस्तेकामांसह पूल, पाणीपुरवठा वाहिन्या, ड्रेनेज आदींसह सुमारे पाच हजार कोटींची कामे महापालिका प्रशासन करत आहे. शहरात कोट्यवधी भाविक येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर वाहने व भाविकांना चकाचक रस्ते असावेत याकरिता चौदाशे कोटी खर्चून रस्त्यांची कामे केली जात आहेत. 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले अमृतस्नान होणार आहे. तत्पूर्वी, शहरातील सर्व विकासकामे मार्गी लावण्याचे दिव्य प्रशासनासमोर आहे. दरम्यान, महापालिकेने ठेकेदारांना बजावलेल्या नोटिसांत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत तुमच्या कामाची प्रगती अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेसे कुशल व अकुशल मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री, वाहने व इतर संसाधने तत्काळ उपलब्ध करून द्यावीत. कामाचे योग्य नियोजन करून दैनंदिन कामकाजाचे उद्दिष्ट निश्चित करावे. त्यानुसार कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. सदर कामे दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
Slow progress on Simhastha-related road works; Commissioner warns of action
- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…
- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…
- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…
- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्या अनेक घटना सातत्याने…
नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…