नाशिक

दिवाळीत एसटीचा 6 नोव्हेंबरपासून राज्यभर चक्का जाम

‘सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’चा इशारा

नाशिक : प्रतिनिधी

दिवाळीच्या सणातच एसटी कर्मचार्‍यांनी शासनाविरोधात आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 17 प्रमुख प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याने ‘सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’ने 6 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. वारंवार आश्वासने देऊनही शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचार्‍यांचा संयम सुटला असून, मागण्या मान्य न झाल्यास ऐन दिवाळीत एसटीची चाके थांबविण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
2024 ते 2028 या कालावधीचा वेतन करार सातव्या वेतन आयोगानुसार लागू करावा, तसेच 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 या कालावधीतील प्रलंबित वेतन करार तातडीने करावेत, अशी संघटनेची मागणी आहे. कर्मचार्‍यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळावे, शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे 58 ते 60 टक्के महागाई भत्ता फरकासह द्यावा, तसेच कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय 2016 पासूनचा प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा फरक एकरकमी द्यावा, प्रत्येक पात्र कर्मचार्‍याला 15 हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देणी अदा करावीत, तसेच प्रशासकीय कर्मचार्‍यांचा 150 रुपयांचा भत्ता वाढवून तीन हजार रुपये किंवा मूळ वेतनाच्या 20 टक्के करावा, अशा मागण्यांचा समावेश आहे.

जिल्हाभरातून पदाधिकार्‍यांची उपस्थिती
या बैठकीस नाशिक जिल्ह्यातील विविध आगारांमधील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून आगामी आंदोलनाची दिशा आणि संघटनेची भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली. कर्मचार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला

मागील सहा महिन्यांपूर्वी परिवहन मंत्र्यांसोबत सर्व युनियनची बैठक होऊन वेतनवाढ व महागाई भत्ता देण्याबाबत सहमती झाली होती. पुढील तीन महिन्यांत फरकाची रक्कम दिली जाईल व महागाई भत्ता वाढेल तसा तो महामंडळाला दिला जाईल, असा शब्द परिवहन मंत्र्यांनी दिला होता. दर महिन्याच्या सात तारखेला वेतन देण्याचेही ठरले होते. मात्र, यातील कोणताही शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे आमच्या हक्कासाठी नाइलाजास्तव आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. – राजाभाऊ पाठक
( विभागीय अध्यक्ष, नाशिक विभाग)

शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी मागण्यांची पूर्तता होत नाही. खासगी कंत्राटदारांची देणी वेळेवर दिली जातात; मात्र महामंडळ तोट्यात असल्याचे कारण देत कर्मचार्‍यांच्या हक्काच्या देण्यांना जाणीवपूर्वक विलंब केला जातो. सातव्या वेतन आयोगाबाबत आणि दिवाळी बोनसबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास 6 नोव्हेंबरपासून एसटी वाहतूक बंद करून बेमुदत संप पुकारला जाईल. – सतीश मेटकरी (सरचिटणीस, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ)

एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे विश्वासू मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक साहेब यांना विनम्र विनंती आहे की, एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या आर्थिक व कौटुंबिक संकटाचा विचार करून त्यांना योग्य न्याय द्यावा. – व्यंकटेश मोरे (कामगार नेते सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ)

 

ST bus services across the state to come to a complete standstill from November 6 during Diwali

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

5 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

5 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

5 hours ago

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…

6 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

6 hours ago

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…

6 hours ago