नाशिक

खानावळ चालवून करतोय सोनसाखळीची चोरी

संशयित सायखेडा पोलिसांच्या जाळ्यात; 50 ग्रॅम सोन्याची लगड, दुचाकी हस्तगत

निफाड : तालुका प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबाडून पसार होणार्‍या सराईत सोनसाखळी चोराला सायखेडा पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सायखेडा, एमआयडीसी सिन्नर आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे तसेच एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. सचिन सुदाम ढेपले (वय 40, रा. ढेपले वस्ती, नांदुर्डी रोड, निफाड, जि. नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो निफाड येथील उगाव रोडलगत एका शॉपिंग सेंटरमध्ये ‘जय मल्हार’ नावाची खानावळ चालवतो.
उगाव रोडलगत असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्यावेळी सीसीटीव्हीच्या आधारे त्यास पकडले होते. या गुन्ह्यात जामिनावर असतानाही त्याने नांदुर्डी रोडलगत आदिवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून पसार झाल्याची घटना घडली. या दोन्ही गुन्ह्यांत तो जामिनावर असताना, सायखेडा पोलिसांनी त्यास खानगाव थडी येथील ‘हॉटेल झोपडी’ येथून पन्नास ग्रॅम सोन्याच्या लगडीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल आणि तीन मोबाइल असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीसपथक खानगाव थडी परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड आणि हवालदार मंगेश गोसावी यांना आरोपीच्या वर्णनाबाबत महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. मांजरगावकडून खानगाव थडीच्या दिशेने लाल युनिकॉर्न मोटारसायकलवर काळ्या रंगाचे हेल्मेट घालून संशयित व्यक्ती भरधाव येत असल्याची माहिती मिळताच सायखेडा पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. खानगाव परिसरातील ‘हॉटेल झोपडी’ येथे संशयित दुचाकीस्वाराला पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सचिन सुदाम ढेपले असल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याने सायखेडा हद्दीतील नागापूर व तळवाडे शिवार, वडांगळी शिवार आणि पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान सोनसाखळी चोरीनंतर चोरीचे सोने विक्री करणार्‍या साखळीचाही पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अजय रमेश कुलथे (वय 46, रा. डी-5, शिमंगल पॅराडाईज, इंदिरानगर, नाशिक) याचे नाव समोर आले आहे, तो सोने खरेदी करणारा सोनार आहे. घनःश्याम निवृत्ती लोंढे (वय 58, रा. सावतानगर, सिडको, नाशिक) हा संबंधित सोनाराकडील कामगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू
आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारवाईला यश
नाशिक ग्रामीण जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या सूचनांनुसार सायखेडा पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. ही कामगिरी सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोलीस उपनिरीक्षक तांदळकर, महिला पोलीस उपनिरीक्षक निकीता खडेकर, हवालदार मंगेश गोसावी, जितेंद्र पाटोळे, जयंत जगताप, अजय पगारे, प्रदीप भाबड, अमोल भाबड, पोलीस नाईक एम. जाधव, संतोष माळोदे, पोलीस शिपाई संदीप लगड, दीपक सानप, जितेंद्र मुकणे, मिलिंद शिरसाठ तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील हवालदार हेमंत गिलबिले यांच्या पथकाने पार पाडली.

Stealing gold chains while running an eatery.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

7 hours ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

8 hours ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

8 hours ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

8 hours ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

8 hours ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

8 hours ago