नाशिक

एक्स्लो पॉइंटवरील वाहतूक पोलीस चौकीवर दगडफेक

आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात अंबड पोलिसांना यश

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंटवरील वाहतूक पोलीस चौकीवर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन अनोळखी आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात गुन्हेशाखा युनिट क्रमांक 2 ला यश आले आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोपेड गाडीही जप्त करण्यात आली आहे.
अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात मोपेडवरील दोन आरोपींचा शोध घेण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील तसेच परिसरातील सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. फुटेजमध्ये आरोपी पोलीस चौकीवर दगडफेक करून पळताना दिसले. यावरून तपासाचा महत्त्वाचा धागा मिळाला.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पाथर्डी फाटा ते अंबडगाव परिसरात मोपेडवर फिरत असल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे शमसुद्दीन नसरुल्लाह शहा (वय 52, रा. चुंचाळेगाव, अंबड लिंक रोड) आणि संतोष मनिराम सरोज (वय 34, रा. संजीवनगर, अंबड लिंक रोड) अशी सांगितली.
पोलिसांनी आरोपींकडून साठ हजार रुपये किमतीची होंडा अ‍ॅक्टिव्हा (एमएच 15-एचपी 2993) जप्त केली आहे. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई सपोनि हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेशाखा युनिट 2 च्या अधिकारी व अंमलदारांनी केली. अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.

Stones pelted at traffic police post at Exlow Point

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago