साडेचार लाखांच्या मुद्देमालासह दोन भंगार विक्रेते जेरबंद
पंचवटी : प्रतिनिधी
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना, गुन्हे शाखा युनिट क्र. 1 च्या पथकाने अत्यंत कौशल्याने दोन भंगार विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे तांबे-पितळाची भांडी आणि कॉपर वायर असा एकूण 4 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे म्हसरूळ परिसरातील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, मुख्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये अज्ञात चोरांनी दुकानातून तांबे-पितळाची भांडी लंपास केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, युनिट 1 चे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना त्यांच्या खास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चोरीला गेलेली भांडी मांडसांगवी येथील एका भंगार विक्रेत्याने विकत घेतली आहेत.
देवळालीगावातून पहिली अटक; रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे समोर
हवालदार योगिराज गायकवाड, अंमलदार गोरक्ष साबळे व राम बर्डे यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून भंगार विक्रेता शेहबाज कासीम चौधरी (वय 19, रा. देवळालीगाव) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून 3 लाख 10 हजार 800 रुपये किमतीची चोरीची तांबे-पितळाची भांडी जप्त करण्यात आली. अधिक चौकशीत ही भांडी त्याला रेकॉर्डवरील गुन्हेगार अशरफ हमीद शेख आणि खुर्शिद हमीद शेख यांनी विकल्याची कबुली त्याने दिली.
..आणि दुसरा गुन्हाही उघडकीस आला!
ताब्यात घेतलेल्या शेहबाज चौधरी याला पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आणखी एका चोरीचा पर्दाफाश केला. संशयित आरोपींनी दुसर्या एका ठिकाणाहून कॉपर वायर चोरली होती आणि ती जाबीर उर्फ जुबेर उमर अरब (वय 43, रा. खोडेनगर) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी जाबीरलाही ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 1 लाख 47 हजार रुपये किमतीची 98 किलो वजनाची कॉपर वायर हस्तगत केली.
Two burglary cases in the Mhasrul area solved.
अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…