वारीकाळात जिल्हाधिकार्यांचा मनाई आदेश
पंढरपूर :
आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठुमाउलींच्या दर्शनाला येणार्या लाखो वारकर्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात उद्यापासून (15 जुलै) थेट 29 जुलैपर्यंत असे 15 दिवस मांस आणि मटण विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकार्यांनी हे कडक आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पंढरपुरातील खवय्यांची अडचण होणार असली, तरी लाखो वारकरी आणि भाविकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले जात आहे.
आषाढी यात्रेच्या काळात दररोज लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पायी चालत येत असतात. या पवित्र काळात शहरातील विविध भागांत सुरू असणार्या मांस आणि मटण विक्रीमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पुढील 15 दिवस म्हणजेच 15 जुलै ते 29 जुलै या वारीच्या काळात पंढरपूर शहर आणि परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Strict ban on meat sales in Pandharpur.