सुख दुःखाची वाटेकरी

आयुष्य हे सुंदर आहे,ते अधिक सुंदर व रंगतदार बनवायचे असल्यास त्या मध्ये मैत्रीचा रंग अधिक गडद आणि सुखावह वाटतो.
मैत्री कशीही, कोणाशीही व्हावी, तिला जात,पंथ,काळा,
गोरा ,गरीब ,श्रीमंत असा भेद नसतो. असो अशीच माझी व वंदना शिंदे (गांगुर्डे)ची मैत्री फुलत गेली.
आम्ही पाचवीला असू, तेव्हा पासून आम्ही दोघी जनता विद्यालय देवरगाव येथे एका वर्गात आठवी पर्यंत शिकलो,नंतर ती पुढे चांदवड येथे गेली मी नववीत असताना भेटत राहीलो.
नववी नंतर समर व्हॅकेशन क्लास साठी तीन महिने मी तिच्या घरीच राहीले कारण जाण्या येण्याची सोय नव्हती.
तीन महिने हसत खेळत असे निघून गेले कळलेच नाही!
नंतर दहावी ला चांगल्या गुणांनी पास होऊन मी डिएड साठी रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे येथे प्रवेश घेतला.दरम्यान माझे वडील वारले.आणि आमचं कुटुंब तेथून धोंडगव्हाण येथे रहायला आले.
तेव्हापासून आमची मध्ये भेटच झाली नाही. मध्यंतरी आमच्या दोघींचे ही लग्न झाले.मी नोकरी निमित्त पिंपळगाव बसवंत येथे राहते,तेव्हा अशीच आमची पुन्हा भेट झाली.तेव्हाची वंदना पुर्ण बदललेली.आम्ही खुप खुप गप्पा मारल्या.भुतकाळात रमून गेलो. तेव्हापासून आजतागायत आमची मैत्री फुलत गेली.मी पुर्वीपासून कविता लेखन क्षेत्रात उतरली होती पण आज आम्ही दोघीही सोबत साहित्यिक कार्यक्रमासाठी जातो.तिने एम ए मराठी केलेलं,शिक्षण तिला गप्प बसू देत नव्हतं
माझ्या सल्ल्याने ती लेखन क्षेत्रात उतरली आज ती एक उत्तम कवयित्री लेखिका बनली आहे. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखाच्या वाटेकरी आहोत.
अशीच आमची मैत्री ,जीवन भर बहरू दे! ईश्वरा!!

सौ.वैशाली जाधव शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *