| नांदगांव / महेंद्र पगार तालुक्यातील आमोदे येथील सतारी शिवार परिसरात शनिवार दि २८ रोजी दहा मोरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली, ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला आमोदे येथील विठ्ठल लाला पगार यांच्या मालकीच्या गट क्रमांक १०० या क्षेत्राला लागून असलेल्या खाजगी व ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या परिसरात काही मोर मृत्युमुखी पडले असल्याचे शेतकरी दिपक पगार हे शेत कामासाठी शेतात जात असताना त्यांना ही बाब निर्दशनास आल्यानंतर त्यांनीही ही माहिती आमोदे गावातील पत्रकार महेंद्र पगार यांना दिल्यानंतर पगार यांनी तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली यावेळी जवळपास दहा मोर मृत्यु मुखी पडल्याचे आढळुन आले, वन विभागाचे आर एफ ओ चंद्रकांत कासार वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ , एन के राठोड ,आर के दौंड , वनपाल सुनील महाले,वनमजुर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला, सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत पुढील तपास नांदगांव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत, मृत्य झालेल्या मध्ये चार लांडोर व सहा मादी यांचा समावेश आहे , मृत्य झालेल्या मोरांचा शेवविच्छेदन करण्यासाठी नांदगांव येथील पशु वैद्यकीय रुग्णलायत पाठवण्यात आले आहेत ,
| |
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…