oplus_2
इगतपुरी पोलिसांची कारवाई, तीन संशयितांना अटक
इगतपुरी : प्रतिनिधी
शहरातील तीन लगडी परिसरात सिद्धार्थनगरात इगतपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत बुलेटसह दहा महागड्या चोरीस गेलेल्या 15 लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या. तसेच तीन संशयितांना अटक केली.
अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. 3) रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील तीन लकडी परिसरात सिद्धार्थनगर बुद्धविहाराजवळ राहत असलेल्या बंटी गांगुर्डे याच्याकडे काही संशयित व्यक्ती आल्या आहेत. त्याच्याकडे बुलेट व हिरो स्प्लेंडर प्लस (नंबर प्लेट नसलेली) मोटारसायकल आहे. याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,
उपविभागीय अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तसरे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, संदीप शिंदे, पोलीस हवालदार दीपक निकुंभ, नवनाथ शिरोळे, कृष्णा गोडसे यांच्या पथकाने खात्री केली. बंटी गांगुर्डेसह संशयितांकडे चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र, त्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवला. तुषार ऊर्फ बंटी भारत गांगुर्डे (वय 24, रा. तीन लकडी इगतपुरी), करण रमेश शिंदे, (26, रा. साकला प्लॉट, एमआयडीसी रोड, ता. जि. परभणी), शामसुंदर मनोज गेडाम, (26, रा. गांधीनगर, अदिलाबाद, ता. जि. अदिलाबाद, तेलंगणा) अशी त्यांनी नावे सांगितली. त्यांच्याकडील बुलेट व हिरो स्प्लेंडरबाबत चौकशी केली. त्या चोरीच्या असून, त्या विक्रीसाठी आणल्या आहेत. गांगुडच्या घराजवळील बंद पडक्या खोलीत लावल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खात्री केली असता पाच विनानंबर मोटारसायकल आढळल्या. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी इगतपुरी शहर व ग्रामीण भागातून तीन विनानंबर मोटारसायकल, अशा रॉयल इनफील्ड कंपनीच्या चार बुलेट, यामाहा कंपनीच्या चार, आरवन फाय, हिरो कंपनीची एक, हिरो स्प्लेंडर प्लस, बजाज कंपनीची एक पल्सर अशा एकूण दहा विनानंबर प्लेट नसलेल्या अंदाजे 15 लाखांच्या मोटारसायकल हस्तगत केल्या. संबंधित मोटारसायकल छत्रपती संभाजीनगर, नाशिक शहर आदी ठिकाणांहून चोरी केल्या. आणखीही चोरीच्या मोटारसायकल मिळण्याची शक्यता आहे. या टोळीचा पर्दाफाश करून आणखी काही कुणी सक्रिय आहे का, याबाबत चौकशी केली जात आहे, असे निरीक्षक तसरे यांनी सांगितले.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…