30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
नाशिक : प्रतिनिधी
एसआयआर मोहिमेंंतर्गत प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर आता यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी निवडणूक आयोगाने अखेरची संधी उपलब्ध करून दिली आहे. अंतिम मतदारयादी 22 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वी वंचित मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान जिल्हा निवडणूक शाखेसमोर आहे. यासाठी दहा लाख 27 हजार गणनापत्रांची छपाई करण्यात आली आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत सुमारे आठ लाख गणनापत्रांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एसआयआरच्या प्रारूप मतदार यादीत विविध कारणांमुळे नावांचा समावेश होऊ न शकलेल्या मतदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात गणनापत्र भरून न दिलेले, स्थलांतरित झाल्यामुळे जुन्या पत्त्यावर आढळून न आलेले, तसेच गैरहजर राहिलेले मतदार एएसडीडी यादीत समाविष्ट आहेत. अशा मतदारांपर्यंत पुन्हा गणनापत्र पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. 28) आणि रविवारी (दि. 29) शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. अद्याप एसआयआर प्रक्रियेत सहभागी न झालेल्या पात्र मतदारांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधावा आणि गणनापत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.
गणनापत्र कोणाला भरता येणार?
♦ पहिल्या टप्प्यात गणनापत्र न भरलेले मतदार.
♦ स्थलांतरित झाल्यामुळे जुन्या पत्त्यावर न आढळलेले मतदार.
♦ गणनापत्र वाटपावेळी गैरहजर असलेले मतदार.
♦ विविध कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेले पात्र मतदार. ♦ अशा मतदारांना सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणनापत्र सादर करता येणार आहे.
असे मिळवा गणनापत्र
संबंधित मतदारांची पूर्वीची माहिती भरलेले गणनापत्र ईसीआयनेट प्रणालीद्वारे मतदार नोंदणी अधिकार्यांना उपलब्ध होणार आहे. हे प्रपत्र प्रत्यक्ष, व्हॉट्सअॅप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन आहे. याशिवाय 28 व 29 नोव्हेंबर 2026 रोजी सर्व मतदान केंद्रांवर होणार्या विशेष शिबिरांत बीएलओंकडून गणनापत्र घेता येणार आहे.
The challenge of distributing eight lakh enumeration forms
- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…
- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…
- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…
- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्या अनेक घटना सातत्याने…
नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…