संपादकीय

भारताचे संविधान : लोकशाहीचा आत्मा

भूमीत माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळतो, त्या भूमीचा खरा आधार तिचे संविधान असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान कितीही चांगले असले, तरी ते राबविणारे लोक चांगले नसतील तर ते वाईट ठरू शकते आणि संविधान कितीही वाईट असले, तरी ते राबविणारे लोक चांगले असतील तर ते संविधान चांगले ठरू शकते. 26 नोव्हेंबर 1949 हा भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय व अभिमानास्पद दिवस आहे.

च दिवशी भारताच्या संविधान सभेने ’भारताचे संविधान’ स्वीकारले. म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारतभर ’संविधान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खर्‍या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी ’भारतीय संविधान’ प्रत्यक्षात अमलात येऊन भारत एक सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक राष्ट्र बनले याचा सर्व भारतीयांना खूप आनंद व अभिमान आहे. भारतात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने पाळला जातो.
संविधाननिर्मिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक महान नेते, विचारवंत, संविधान सभेच्या सदस्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. यात प्रामुख्याने राज्यघटनेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस. एन. मुखर्जी (संविधान आराखडा), सर बी. एन. राव (संविधान सभा घटनात्मक सल्लागार), बेगम एजाज रसूल, माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद (संविधान सभा अध्यक्ष), पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अबुल कलाम आझाद, एन. माधवराव, सय्यद सादुल्ला, अल्लादी कृष्णा स्वामी अय्यर व सर बेनेगल, नरसिंग राव आदींचे योगदान भारताचे संविधान अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण ठरले. 29 ऑगस्ट 1947 प्रारूप समितीच्या सदस्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय दिसते. डॉ. आंबेडकरांनी लहानपणापासून भारतीय समाजातील सामाजिक विषमता, अस्पृश्यता, अन्याय, शोषण, संघर्ष अनुभवला. तेव्हापासून भारतातील प्रत्येक माणसाला समान अधिकार, समान संधी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. भारतीय राज्यघटना पूर्ततेसाठी जवळपास दोन वर्षे 11 महिने 17 दिवसांचा कालावधी लागला.
भारतीय संविधानातील मूलभूत तत्त्वेे
भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत चार महत्त्वपूर्ण मूल्य दिसतात 1) न्याय :  सामाजिक, आर्थिक, राजकीय. 2) स्वातंत्र्य : विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास व उपासनेचे स्वातंत्र्य. 3) समता : दर्जाची व संधीची समानता. 4) बंधुता : प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आधार व राष्ट्राची एकता व अखंडता. ही चार मूल्ये संविधानातील फक्त शब्द नसून भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनात जगण्याची मूल्ये आहेत.
अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव
मूलभूत हक्क व कर्तव्य ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. लोकशाहीच्या यशस्वितेसाठी भारतीय नागरिकांनी आपल्या मूलभूत अधिकाराबरोबर कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे. संविधान आपणास अधिकार देते, पण त्याचबरोबर कर्तव्यपालनाची जाणीव करून देते. भारतातील प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. जसे- राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. देशाची एकता व अखंडता जपावी, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे, समाजात बंधुभाव निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असून, त्याचे पालन करावे.
भारतीय संविधान व आजची तरुण पिढी
भारतातील प्रत्येक तरुणाने भारताचे संविधान अभ्यासणे ही काळाची गरज आहे. आजच्या युवकांनी आपल्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच भारताच्या संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य समजून घेणे, ही काळाची गरज आहे.
भारतातील शाळा, महाविद्यालय, कुटुंब, समाज या ठिकाणी संविधानिक मूल्यांचे पालन काटेकोरपणे झाले पाहिजे. आजच्या तरुणांनी दैनंदिन जीवन जगत असताना इतरांच्या मताचा आधार, स्त्रियांचा सन्मान, जातीय भेदभाव नष्ट करणे, सामाजिक विषमतेला थारा न देणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे, या कर्तव्याचे पालन केल्यास खर्‍या अर्थाने देशाची एकता व अखंडता अबाधित राहून लोकशाही बळकट होईल.

 

The Constitution of India: The Soul of Democracy

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

रोज चालण्याचे महत्त्व

लिपिड प्रोफाइल आणि निरोगी हृदयाचे गुपित सध्याच्या बैठ्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत…

3 hours ago

हेमंत ऋतू आणि आयुर्वेद

गुलाबी थंडीची चाहूल लागली की, निसर्गासोबतच मानवी शरीरातही अनेक बदल घडू लागतात. आयुर्वेदाने वर्षाची सहा…

3 hours ago

अक्करमाशी

दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सांस्कृतिक उत्सव. महाराष्ट्राची सांस्कृतिक…

3 hours ago

थंडीचा कडाका वाढताच ऑनलाइन योग वर्गार्ंची क्रेझ

घरबसल्या नागरिकांकडून आरोग्याची काळजी नाशिक : प्रतिनिधी शहरात थंडीचा कडाका वाढू लागल्याने सकाळी लवकर घराबाहेर…

4 hours ago

सिंहस्थात डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

15 डिसेंबरपर्यंत सर्व विभागांना कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यातील संभाव्य…

4 hours ago

नाशकात सायबर ठगांचा 45 कोटींवर ‘डल्ला’

अकरा महिन्यांत 93 गुन्हे; शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सर्वाधिक लूट नाशिक : देवयानी सोनार तंत्रज्ञानाचा वाढता…

4 hours ago