नाशिक

माळेगाव औद्योगिक वसाहतीत चोरीच्या घटनांत वाढ

चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची ‘सिमा’ची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीत चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने उद्योजकांत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून औद्योगिक वसाहतीत सुरक्षिततेची प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तथा सिमाने
केली आहे.
सातत्याने घडणार्‍या चोरीच्या घटनांमुळे औद्योगिक वसाहतीत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव बबन वाजे, उपाध्यक्ष किरण भंडारी, कोषाध्यक्ष राहुल नवले, तसेच विश्वस्त रतन पडवळ, मारुती कुलकर्णी, अरुण चव्हाणके, शांताराम दारुंटे, मुकेश देशमुख, शशिकांत नवले, नवनाथ नागरे, दत्ता नवले, अरुण खालकर, सुधीर जोशी आदी पदाधिकार्‍यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, तसेच सकाळी व सायंकाळी वसाहतीच्या मुख्य रस्त्यांवर नियमित गस्त घालावी. त्यामुळे चोरट्यांमध्ये वचक निर्माण होईल. सध्या उपाययोजना अपुर्‍या असल्याने चोरटे निर्भयपणे कृत्य करत आहेत. वसाहतीतील अनेक लघुउद्योग 24 तास खासगी सुरक्षारक्षक नेमू शकत नाहीत. परिणामी, अशा उद्योगांना लक्ष्य केले जात असून, व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करून आवश्यक पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक करावी, ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका सिमा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.
मंगळवारी रात्री माळेगाव एमआयडीसी परिसरातील आयुष मोटार रिवाइंडिंग अँड इलेक्ट्रिकल्स या कंपनीचे कुलूप तोडून चोरट्यांनी कॉपर वायर चोरी केली. यापूर्वी मागील आठवड्यात नाशिक पॉवर कंपनीमधून कॉपर चोरीची घटना घडली होती. तसेच शनिवारी आदीश इंडस्ट्रीजमध्ये संगणक व इतर साहित्य चोरीला गेले. या सर्व घटनांचा अद्यापही उलगडा झालेला नाही. यापूर्वी हिंद रेक्टीफेजमधूनही कॉपर चोरी झाली होती.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

11 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

19 minutes ago

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

29 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

36 minutes ago

इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे 15 लाखांची आर्थिक फसवणूक

50 लाखांच्या परताव्याचे दिले होते आमिष सिडको : प्रतिनिधी इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे कंपनीची माहिती देत 15…

47 minutes ago

नाशिकमध्ये बेकायदा बाइक टॅक्सींचा सुळसुळाट

अ‍ॅग्रिगेटर धोरणाची मंजुरी नसल्याचा परिवहन विभागाचा दावा पंचवटी : प्रतिनिधी नाशिक शहरात रॅपिडो, ओला आणि…

52 minutes ago