नाशिक

दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न जलसंपदा मंत्र्यांच्या दारी

नाशिकरोडच्या माजी नगरसेवकांचे मंत्री महाजनांना साकडे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड विभागात दोन आठवड्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याप्रकरणी नाशिकरोड विभागातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी साकडे घातले. याप्रकरणी महाजन यांनी जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांना फोन करून चेहेडी पंपिंगमधील दूषित पाणी सोडून देऊन दारणातून स्वच्छ पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे नाशिकरोडमधील विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला.
माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, दिनकर आढाव, प्रा. शरद मोरे, सचिन हांडगे, उद्धव निमसे, सुरेश खेताडे, सुरेश गांगुर्डे, अरुण पवार आदी उपस्थित होते. गेल्या दहा दिवसांपासून नाशिकरोड येथे पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून, प्रशासकीय राजवटीत महापालिकेमध्ये बदल्या झाल्या. त्यात पाणीपुरवठा विभागात काही अधिकारी मनाविरुद्ध काम करत आहेत. दरवर्षी दारणेचे रोटेशन बंद झाल्यानंतर चेहेडी बंधार्‍यात देवळाली कॅम्प, भगूर व वालदेवीचे दूषित पाणी मिसळून संपूर्ण पाणीच दूषित होते. त्याचवेळी गंगापूर धरणातून येणार्‍या पाण्यावर नाशिकरोडला विसंबून राहावे लागते. गांधीनगर ते नाशिकरोड पंपिंग स्टेशन येथे रॉ-वॉटर जलवाहिनीची क्षमता 50 दशलक्ष लिटर (एमएलडी) इतकीच आहे. व नाशिकरोडची पाणी आवश्यकता 72 दशलक्ष लिटर (एमएलडी) आहे. त्यामुळे गंगापूरहून येणारे पाणी योग्य नियोजनाने नाशिकरोडच्या सर्व भागांत वितरित करावे लागते. नवीन अधिकारी व इच्छाशक्ती अभाव यामुळे कमी-अधिक प्रमाणात पाणी सोडल्याने सर्वच भागांत कमी दाबाने पाणी मिळून नागरिकांमध्ये असंतोष आहे. याप्रश्नी नाशिकरोडमधील माजी नगरसेवकांनी जलसंपदामंत्री महाजन यांची मुंबईत भेट घेत त्यांच्या कानी हा प्रश्न टाकला. त्यांनी यात लक्ष घालून संबंधितांना सूचना केल्याने नाशिकरोडमधील पाण्याचा तुटवडा भरून काढला जाईल.

गांधीनगर येथील जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास चेहेडी बंधार्‍यात पाणी नसले तरी अशावेळी गांधीनगरमधून पूर्णक्षमतेने आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही. तसेच नाशिकरोडमधील विस्कळीत होणार्‍या पाणीपुरवठ्यातून कायमची सुटका होईल. मंत्री महाजन यांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
– संभाजी मोरुस्कर, माजी नगरसेवक नाशिकरोड, प्रभाग 20

गांधीनगर जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

मंत्री महाजन यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना फोन करून गांधीनगर ते नाशिकरोड पंपिंग स्टेशनपर्यंत गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या जलवाहिनीच्या कामाबाबत विचारले असता, या जलवाहिनीचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित तत्काळ करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या.

 

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…

20 hours ago

काशीविश्वनाथ मंदिराचा देखावा ठरणार यंदा शहराचे मुख्य आकर्षण

बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…

20 hours ago

मेघा आहेर ठरली सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…

22 hours ago

बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला विहिरीत

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…

22 hours ago

शिंदेसेना स्थानिक स्वराज्य संस्थेचे फुंकणार रणशिंग!

मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…

23 hours ago

तिसर्‍या श्रावण सोमवारच्या फेरीसाठी त्र्यंबकला भाविक दाखल

दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारच्या ब्रह्मगिरी…

23 hours ago