इच्छुकांचे लक्ष; अनुसूचित जातीसाठी निघण्याची शक्यता
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज, गुरुवारी (दि.22) जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतीकडे भाजपा नगरसेवकांचे लक्ष लागले असून, कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघणार यावरून मागील दोन-तीन दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र, असे असले तरी कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघेल याची उत्सुकता शिगेला गेली आहे. महापालिकेत सर्वाधिक 72 जागा जिंकणार्या भाजपचा महापौर बसणार हे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी मुंबईत महापौर पदाचे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नाशिकसाठीचे आरक्षण आवर्तनानुसार निघते की सोडतीद्वारे काढले जाते यावरच महापौरपद निश्चित होणार आहे. निवडणुकीच्या आधी महापालिका महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाते. यंदा मात्र ही आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार आहे. आता रोटेशन पद्धतीने सोडत काढल्यास नाशिकचे 17 वे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता आरक्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरपदावर कुणाची वर्णी लागणार, हे या आरक्षण सोडतीतून स्पष्ट होणार आहे. 2017 च्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्या अडीच वर्षांत अनुसूचित जमातीचे, तर त्यानंतर महापौर आरक्षण सर्वसाधारण होते. त्यामुळे आता रोटेशन पद्धतीने सोडत काढल्यास नाशिक महापालिकेचे 17 वे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होऊ शकते. चिठ्ठी पद्धतीने काढल्यास आरक्षण अन्य प्रवर्गाचे निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2022 पासून मनपात प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून कारभार सुरू होता. जवळपास पावणे चार ते चार वर्षांपासून लोकप्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत होते. अखेर निवडणूक पार पडली.
2014 पासूनचे आरक्षण
सन 2014 ते 2017 या कालावधीसाठी नाशिकचे महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होते. या कालावधीत मनसेचे तत्कालीन नगरसेवक अशोक मुर्तडक यांना महापौरपदाची संधी मिळाली. 2017 ते 2019 या कालावधीसाठी महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या रंजना भानसी, तर 2019 ते 2022 या कालावधीत सर्वसाधारण झाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांना महापौर पदाची संधी मिळाली होती.
The lottery for mayor reservation will be held today.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…