नाशिक

कत्तलखान्यांच्या प्रतिबंधासाठी पोलिस करणार कारवाई

सिडको : प्रतिनिधी
गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अनधिकृत कत्तल आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांना प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात आंतरविभागीय समन्वय बैठक पार पडली. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून संयुक्त कारवाई करण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावीपणे राबविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संबंधित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी, संशयित वाहनांवर लक्ष ठेवणे, अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करणे आणि विविध विभागांमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित विभागांना त्यांच्या स्तरावर नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करून समन्वयित आणि प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात संयुक्त पद्धतीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी नाशिक, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भगूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे उपआयुक्त यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके आणि नोडल अधिकारी डॉ. समाधान हिरे यांनीही सहभाग नोंदविला.

The sale of ‘black maine’ from the mountains has given employment to tribal brothers

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

34 seconds ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

3 minutes ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

9 minutes ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

18 minutes ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

26 minutes ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

35 minutes ago