आस्वाद

दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले!

आयुष्यात प्रत्येक माणसाला दीर्घ काळ जगण्याची इच्छा असते. त्यासाठी विविध प्रयत्नही केली जातात. जगात कुठे ना कुठे सव्वाशे ते दीडशे वर्षे माणसं जगल्याची उदाहरणे आहेत. परंतु, त्यांचे प्रमाण फार कमी आहे. मानवाचे आयुष्य किती असेल, हे नेहमीच वैज्ञानिकांसाठी एक मोठे कोडे राहिले आहे. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, स्वच्छ पर्यावरण आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा यांचा आयुष्यावर प्रभाव पडतो, हे आपण जाणतो. आज जगात दीर्घायुषी माणसं जपान या देशांमध्ये मोठ्या संख्येने आढळतात. शंभर वर्षांपेक्षाही अधिक काळ जगणारी माणसं तेथे आहेत. तेथे दीर्घायुषी लोकांचे क्लबदेखील आहेत. बर्‍याचदा याचे श्रेय हे तेथील आरोग्यदायी जीवनशैलीला दिले जाते. अर्थात, ते काही अंशी बरोबरदेखील आहे.
मात्र, अलीकडील संशोधनानुसार आपल्या शरीरातील जनुके आयुष्य किती लांब असेल, यावर पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक प्रभाव टाकू शकतात. मानवी शरीरात रंगसूत्रांच्या एकूण 23 जोड्या असून 23 वी जोडी मात्र व्यक्तीचे लिंग ठरवीत असते. त्या रंगसूत्रांवर जनुके तथा जीन्स असतात. जनुके म्हणजे आपल्या शरीराची जैविक माहिती साठवून ठेवणारे सूक्ष्म घटक. त्यांना डीएनए असेही म्हणतात. आई-वडिलांकडून मिळालेल्या या जनुकांमुळे आपल्या डोळ्यांचा रंग, उंची, त्वचेचा प्रकार तसेच काही रोगांची शक्यता ठरते. अनेकदा जनुकांमुळेच अनुवंशिक आजार देखील व्यक्तीमध्ये पाहायला मिळतात. उदा. अल्झायमर, स्थूलता, हिमोफिलिया, त्वचेवरील पांढरे डाग, इत्यादी. आता संशोधकांचे असे मत आहे की हीच जनुके आपल्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेलाही नियंत्रित करतात. म्हणजेच वार्धक्य थांबविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक माणसं दीर्घायुषी जीवन जगतात. अनेक माणसं वय झालं तरीही लवकर वृद्ध होत नाहीत.
अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ मानत होते की व्यक्तीच्या आयुष्यावर जीवनशैलीचा आणि पर्यावरणाचा प्रभाव जास्त असतो. उदाहरणार्थ, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव आणि चुकीचा आहार यामुळे आयुष्य कमी होऊ शकते. परंतु, हे घटक मात्र आता दीर्घायुष्य ठरवणारे नाहीत असे दिसून आले आहे. परंतु, नवीन अभ्यासांमध्ये मात्रअसे दिसून आले आहे की काही लोकांमध्ये असे विशिष्ट जनुकीय गुणधर्म असतात. ज्यामुळे त्यांचे शरीर पेशींची दुरुस्ती अधिक प्रभावीपणे करते. त्यामुळे त्यांचे वृद्धत्व तुलनेने संथ गतीने होते.
विशेषतः दीर्घायुषी लोकांच्या कुटुंबांचा अभ्यास करताना वैज्ञानिकांना काही समान जनुकीय वैशिष्ट्ये आढळली. ज्या कुटुंबांमध्ये अनेक लोक 90 किंवा 100 वर्षांपेक्षा अधिक जगतात, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणारी आणि पेशींना नुकसानापासून वाचवणारी जनुके अधिक प्रमाणात आढळतात. काही जनुके शरीरातील सूज कमी ठेवण्यास मदत करतात, तर काही हृदयविकार किंवा मधुमेहाचा धोका कमी करतात.
संशोधकांनी असेही नमूद केले आहे की, जनुकांचा प्रभाव पूर्णपणे निश्चित नसतो. म्हणजेच “वाईट” जनुके असली तरी चांगली जीवनशैली अंगीकारल्यास आयुष्य वाढू शकते. त्याचप्रमाणे उत्तम जनुके असली तरी अस्वास्थ्यकारक सवयींमुळे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे जनुके आणि जीवनशैली हे दोन्ही घटक एकमेकांशी जोडलेले आहेत.
या संशोधनाचा भविष्यात वैद्यकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. जर वैज्ञानिकांना दीर्घायुष्याशी संबंधित महत्त्वाची जनुके पूर्णपणे समजली, तर भविष्यात वृद्धत्वाची गती कमी करणारी औषधे किंवा उपचार विकसित होऊ शकतील. काही संशोधक तर “वैयक्तिक जनुकीय आरोग्य योजना” तयार करण्याची कल्पना मांडत आहेत, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जनुकांनुसार योग्य आरोग्य सल्ला दिला जाऊ शकेल.
तथापि, या क्षेत्रात अजूनही बरेच संशोधन आवश्यक आहे. आयुष्य केवळ जनुकांवर अवलंबून नसून सभोवतालचे पर्यावरण, सामाजिक परिस्थिती, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली यांचाही मोठा वाटा असतो. तरीही या नव्या अभ्यासामुळे मानवाच्या दीर्घायुष्याबद्दलचे वैज्ञानिकांचे आकलन अधिक सखोल होत आहे.
एकंदरीत, “आपण किती जगू?” या प्रश्नाचे उत्तर आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. आपल्या सवयी महत्त्वाच्या आहेतच, पण आपल्या शरीरात दडलेली जनुकेदेखील आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात.

The secret to longevity revealed!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago